मुख्यपृष्ठ / पाककृती / नो अवन नो गॅस हेल्दि केक ( माई ईनोवे्शन)

Photo of No Oven No Gas Healthy Cake ( My Innovation) by Tejashree Ganesh at BetterButter
1470
5
0.0(0)
0

नो अवन नो गॅस हेल्दि केक ( माई ईनोवे्शन)

Dec-16-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नो अवन नो गॅस हेल्दि केक ( माई ईनोवे्शन) कृती बद्दल

ही पाककृती मी स्वतः प्रयोग म्हणून बनवली आहे. हिवाळ्यामधे आपण आहारात सर्वात जास्त महत्त्व देतो ते सुक्या मेव्याला, लाडू, खजूर रोल वगैरे बरोच प्रकार केल्यानंतर ही कल्पना सुचली.. अगदी कुठलेही इंधन न वापरता केलेली healthy treat.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खजूर ८ ते १०
  2. खोबरं पावडर किंवा खोबरं किस १ कप
  3. सुका मेवा आवश्यकते नुसार
  4. कंडेन्स्ड मिल्क आवश्यकते नुसार
  5. डेट सिरप ऐच्छिक
  6. ईलायची पावडर १/२

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य बाजूला काढून घेतले.
  2. डेट सिरप
  3. खोब-यामधे कंडेन्स मिल्क थोडे थोडे टाकून केले गोळा होई पर्यंत एकत्र केले.
  4. सुक्या मेव्याची पावडर करून घेतली.
  5. खजूरचे बी काढून बारिक काप केले.
  6. ह्यामधे सुकामेवा पावडर व ईलायची पावडर मिक्स केले.
  7. थोडेसे डेट सिरप टाकून गोळा करून घेतला. ( हा स्टेप ऐच्छिक आहे.)
  8. खोब-याच्या गोळ्याचे समान २ भाग केले. व खजूरच्या गोळ्याचा १ च अखंड गोळा केला.
  9. एका कॅलींग फिल्म (जेवण वर लावण्याकरिता येणारे पातळ प्लास्टिक ) घेऊन त्यावर खोब-याचा गोळा ठेवला.
  10. हा गोळा कॅलिन्ग फिल्म च्या साहाय्याने आयताकार लाटून घेतला
  11. ह्याचप्रमाणे दुसराही गोळा लाटून घेतला.
  12. खजूरचाही गोळा लाटून घेतला.
  13. आता हे तिनही गोळ एका मोठ्या प्लेट किंवा ताटात ठेवून फ्रिजमधे ३०-४० मि. ठेवावे.
  14. नंतर फ्रिजमधून बाहेर काढून. प्रथम खोब-याची पट्टी बाजूला कढून त्यावर डेट सिरप टाकले.
  15. त्यावर सुक्या खोब-याची पावडर टाकली. व थोडे प्रेस करून घेतले.
  16. मग दुसरी खोब-याची पट्टी घेतली, त्यावरही वरिल प्रमाणे सिरप व खोबरं टाकून व्यवस्थित दाबून घेतले.
  17. खोबरे टाकून
  18. मग १ खो-याच्या पट्टीवर खजूरचू पट्टी ठेवली आणि ह्यावर पुन्हा एक खोब-याची पट्टी ठेवली.
  19. सर्व बाजूंनी व्यवस्थित दाबून घेतले. व ह्यावर खोबरं पावडर लावून घेतले.
  20. त्यावर डेट सिरप ने गार्निश करा
  21. आणि ३० मि. Set होण्यासाठी फ्रिजमधे ठेवले. केक तयार आहे.
  22. हवे तर असेही खाऊ शकतो किंवा चौकोणी पेस्ट्री प्रमाणे तुकडे करूनही खाऊ शकतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर