मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ भाजी चे थालीपीठ

Photo of Dal-bhaji thalipith by seema Nadkarni at BetterButter
979
2
0.0(0)
0

डाळ भाजी चे थालीपीठ

Dec-19-2018
seema Nadkarni
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ भाजी चे थालीपीठ कृती बद्दल

काल रात्री माझ्या नवर्‍यानी बाहेर जेवण करून आल्या मूळे त्याच्या वाटणीची डाळ, भाजी, भात व पोळी उरले होते.. त्याचे सकाळी नाश्ता साठी एकत्र करून थालीपीठ बनवले. कुरकुरीत होतात.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप गाजर, कोबी ची भाजी
  2. 1 कप आमटी (फोडणी चे वरण)
  3. 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
  4. 1 चमचा आले लसुण पेस्ट
  5. चवी पुरते मीठ
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 1 चमचा लाल तिखट
  8. 1/2 टी स्पून हळद
  9. 1 चमचा तीळ
  10. 1 कप मक्याचे पीठ
  11. 1 कप मल्टी ग्रेन आटा
  12. 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची.

सूचना

  1. सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. एका बाउल मध्ये डाळ व भाजी एकत्र करावे.
  3. त्यात चवीप्रमाणे मीठ व सगळे मसाले, बारीक चिरलेला कांदा एकत्र करावे.
  4. त्यात मावेल तितके मक्याचे पीठ व मल्टी ग्रेन आटा एकत्र करून मळून घ्यावे.
  5. पीठ मळून थोड्या वेळ झाकून ठेवावे.
  6. पेन मध्ये थोडे तेल घालून थापून घ्या. व दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर