मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती समोसा

Photo of Chapati samosa by Rohini Rathi at BetterButter
714
1
0.0(0)
0

चपाती समोसा

Dec-24-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती समोसा कृती बद्दल

चपाती उरल्यानंतर त्याचा काय करावा हा मोठा गहन प्रश्न असतो तर चपातीला मध्यभागी चिरून त्यामध्ये समोसाची सारण भरून तळलेला चपाती समोसा झटपट बनतो व खाण्यास खूप स्वादिष्ट लागतो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेल्या चपात्या 2
  2. मैदा एक चमचा
  3. पाणी अर्धा चमचा
  4. समोसा सारण बनवण्यासाठी
  5. उकडलेले दोन मध्यम बटाटे
  6. उकडलेले बटाटे पाव कप
  7. बारीक चिरलेला कांदा
  8. आले-लसणाची पेस्ट अर्धा चमचा
  9. हिरवी मिरचीची पेस्ट अर्धा
  10. तेल एक चमचा
  11. जिरे मोहरी फोडणीसाठी
  12. हळदी पावडर पाव चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा
  15. तेल समोसा तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम चपात्या चे मध्यभागी कापून घ्यावी
  2. सारण बनवण्यासाठी
  3. उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे
  4. कढईत तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी घालावी
  5. नंतर त्यात आले-लसणाची पेस्ट मिरचीची पेस्ट व चिरलेला कांदा परतून घ्यावा
  6. नंतर कुस्करलेला बटाटा व वाटाणे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  7. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यावे
  8. मिश्रण प्लेट मध्ये काढून थंड
  9. मैद्यामध्ये आधा तुमच्या पाणी घालून घट्ट मिश्रण बनवावे
  10. चपातीला मध्यभागी अशा प्रकारे मैद्याची पेस्ट लावून अर्धा भाग दुमडून घ्यावे चिटकवून घ्यावे
  11. नंतर दुसरा भाग त्यावर ती ठेवून त्रिकोण बनवून घ्यावा
  12. थंड झालेले मिश्रण त्यात भरून घ्यावे
  13. वरील कडाला मैद्याची पेस्ट लावून बंद करून घ्यावे
  14. अशाच प्रकारे सर्व समोसे बनवून घ्यावे
  15. कढईत तेल गरम करून कुरकुरीत होईपर्यंत समोसे तळून घ्यावे
  16. गरमागरम चपाती समोसे टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर