मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या ब्रेडचा ढोकळा

Photo of Leftover Bread Dhokla by Tejashree Ganesh at BetterButter
173
5
0.0(0)
0

उरलेल्या ब्रेडचा ढोकळा

Dec-25-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या ब्रेडचा ढोकळा कृती बद्दल

उरलेल्या ब्रेडपासून बनवलेला ढोकळा, ही पाककृती माझे स्वतःचे innovation आहे. सहज प्रयोग करून पाहिला, खुप छान रेसिपी जमली.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. ब्रेड चा चुरा किंवा ब्रेड क्रम्ब्ज १ कप
 2. रवा १ चमचा
 3. चविपुरते मिठ
 4. दही १/२ कप
 5. पाणी आवश्यकतेनुसार
 6. ईनो १ चमचा
 7. फोडणीकरिता-
 8. तेल १ चमचा
 9. मोहरी १ चमचा
 10. हिरवी मिरची २-३
 11. कढिलिंबाची पाने ५-६
 12. साखर पाणी (१ चमचा साखर व १/२ कप पाणी)
 13. कोथिंबीर
 14. खोबरं (optional)

सूचना

 1. प्रथम ब्रेड क्रम्ब्ज, रवा व मिठ एका बाऊल मधे घेतले. तसेच दही दुस-या बाऊल मधे घेतले.
 2. एका मोठ्या बाऊल मधे वरिल साहत्य एकत्र केले.
 3. हे साहित्य पाण्याच्या साहाय्याने एकजिव करून घेतले. (पाणी थोडे थोडे व आवश्यकतेनुसार टाकून एकत्र करावे.)
 4. १० मि. हे मिश्रण झाकून बाजूला ठेवावे.
 5. गॅसवर मध्यम आचेवर एका भांड्यात २० मि. पुरेल एवढे पाणी घेऊन त्यात एक रिंग ठेवावी. हे पाणी उकळत ठेवावे.
 6. ज्या भांड्यात ढोकळा लावायचा ते तेलाने व्यवस्थित ग्रिस करून घ्यावे.
 7. पाणी उकळले की बाजूला ठेवलेल्या मिश्रणामधे ईनो टाकून पटकन् फोडून घेऊन लगेचच ग्रिस केलेल्या भांड्यात ओतावे.
 8. व भांडे उकळलेल्या पाण्यावर ठेवून झाकन लावून घ्यावे.
 9. साधारण २० मि. हा ढोकळा वाफवून घ्यावा. २० मि. नंतर काळजीपुर्वक झाकण कढून चाकूने ढोकळा झाला की नाही ते चेक करावे.
 10. ढोकळा बाहेर काढून घ्यावा, थोडा थंड झाला की चौकोणी तुकड्यांत कापून घ्यावा.
 11. त्यावर साखरेचे पाणी सर्वत्र टाकावे.
 12. फोडणीच्या भांड्यात थोडे तेल टाकून तेल गरम झाले की मोहरी टाकावी, हिरव्या मिरच्या व कढिलिंबाची पाने टाकावीत. व ही फोडणी ढोकळ्यावर सर्वत्र टाकून घ्यावी.
 13. खोबरं व बारिक चिरलेली कोथिंबीर टाकून सरजवावे. हा ढोकळा फार चविष्ट लागतो.
 14. हा ढोकळा चविष्ट तसेच spongy ही होतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर