BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेला इटालियन पास्ता आणि उरलेल्या घडीच्या पोळ्यांचे समोसे

Photo of Urlela Italian Pasta aani Urlelya Ghadichya Polyanche Samose by Vaishali Joshi at BetterButter
0
4
0(0)
0

उरलेला इटालियन पास्ता आणि उरलेल्या घडीच्या पोळ्यांचे समोसे

Dec-27-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेला इटालियन पास्ता आणि उरलेल्या घडीच्या पोळ्यांचे समोसे कृती बद्दल

नावावरुन लक्षात आलेच असेल रेसिपी.. बच्चे कंपनी नक्कीच खूप खुश होतील हे समोसे खाऊन .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तयार उरलेला इटालियन पास्ता १ वाटी
  2. उरलेल्या घडीच्या पोळ्या ३
  3. मैदा १ चमचा
  4. चिज क्यूब १
  5. तेल तळण्यासाठी
  6. कोथिंबीर
  7. चिली फ्लेक्स
  8. ओरेगानो
  9. मिठ

सूचना

  1. उरलेला तयार पास्ता घेऊन त्यात एक्स्ट्रा चीज किसून घाला
  2. त्यात गरज वाटल्यास मीठ आणि चीली फ्लेक्स , ओरेगानो व कोथिंबीर घालून एकत्र करून समोस्याचे फिलिंग करून घ्या
  3. उरलेल्या घडीच्या पोळी ला मधून कट करून घ्या
  4. मैद्या मध्ये थोडस पाणी घालून पेस्ट करून घ्या
  5. पोळी चा कोन करून त्याच्या कडा मैद्याच्या पेस्ट ने चीपकवून घ्या
  6. अशा प्रकारे कोन करून घ्या
  7. आता यात पास्त्याचे फिलिंग भरा
  8. आणि व्यवस्थीत चीपक्वून घ्या व समोस्याचा आकार द्या
  9. अशाच प्रकारे सर्व समोसे करून घ्या
  10. गॅस वर कढईत तेल तापत ठेवून ते तापले की त्यात समोसे डीप फ्राय करून घ्या
  11. मस्त कुरकुरीत टेस्टी असे इटालियन पास्ता समोसे तयार
  12. गरमागरम समोसे आवडीच्या सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर