मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या कोबीच्या भाजीचे स्प्रिंग रोल्स (माई् ईनोव्हेशन)

Photo of Lefover cabbage sabji Spring Rolls (My Innovation) by Tejashree Ganesh at BetterButter
686
3
0.0(0)
0

उरलेल्या कोबीच्या भाजीचे स्प्रिंग रोल्स (माई् ईनोव्हेशन)

Dec-31-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या कोबीच्या भाजीचे स्प्रिंग रोल्स (माई् ईनोव्हेशन) कृती बद्दल

कोबीची भाजी उरली असताना ह्यात थोडे बदल करून spring rolls बनवले. थोडा healthy twiat दिला. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. फार स्वादिष्ट रेसिपी तयार झाली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली कोबीची भाजी १ वाटी
  2. गाजर किसून १/२ वाटी(ऐच्छिक)
  3. सिमला मिर्ची तुकडे १/२ वाटी (एेच्छिक)
  4. गव्हाच्या पिठाचे होम मेड रॅप्स ५-६
  5. गव्हाचे पिठ १ चमचा
  6. तेल

सूचना

  1. प्रथम एका बऊल मधे किसलेले गाजर व सिमला मिरची तुकडे घेतले, बाजूला कोबीची उरलेली भाजी व गव्हाच्या पिठचे होम मेड रॅप्स असे सर्व साहित्य घेतले.
  2. एका पॅन मधे थोडे तेल टाकून गाजराचा किस व सिमला मिर्ची तुकडे थोडे फ्राय करून घेतले. व बाजूला कढून घेतले. (फार जास्त शिजवू नयेत)
  3. त्याच पॅन मधे कोबीची भाजीही थोडू परतून घेतली त्यामुळे त्यातले extra moisture निघून जाते.
  4. ह्यमधे गाजर-सिमला मिर्ची टाकली. (मी ईतर कुठलेही मसाले टाकले नाहीत, हवे तर टाकू शकतो. )
  5. १ चमचा गव्हाच्या पिठाची पेस्ट तयार केली.
  6. एक रॅप प्लेटमधे घेऊन त्यावर १-२ चमचे भाजीचे स्टफिंग टाकले.
  7. सर्व बाजूंनी गव्हाच्या पिठाची पेस्ट लावून घेतली.
  8. गुंडाळी करत गेले. स्टेप १.
  9. स्टेप २.
  10. वरिल व खालील बाजूस पेस्ट लावून घेतली.
  11. अशा प्रकारे आतल्या बाजूने घडी घालून घेतली.
  12. व शेवटी ह्या पद्धतीने रोल बंद करून घेतला. व अशाच प्रकारे सर्व रोल्स करून घेतले.
  13. पॅन मधे थोडे तेल टाकले व त्यात हे रोल्स ठेवून शॅलो फ्राय करून घेतले.
  14. सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय झाले की किचन टिश्युवर काढून घेतले. ह्यामुळे त्यातले अतिरिक्त तेल निघून जाते.
  15. टोमॅटो सॉस व मेयो सोबत अप्रतिम लागते किंवा हवे त्या चटणीबरोबर गरम गरम serve करू शकतो.
  16. भाजीचे स्टफिंग पुर्णपणे व्यवस्थित भरले गेले आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर