मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती चे कुकीज

Photo of Chapati cookies by Swapnal
swapna p at BetterButter
979
2
0.0(0)
0

चपाती चे कुकीज

Jan-03-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती चे कुकीज कृती बद्दल

बऱ्याचदा शिळ्या चपात्या उरतात त्यापासून जर आपण ह्या कुकीज केल्या तर ओळखायला पण येत नाहीत की शिळ्या चपातींच्या कुकीज आहेत अतिशय खुसखुशीत आणि रोठसारख्या लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • बेकिंग

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चपाती एक
  2. रवा दोन चमचे
  3. मैदा एक चमचा
  4. बेसन दोन चमचे
  5. पिठीसाखर चार चमचे
  6. तूप एक चमचा
  7. वेलची पूड चिमूटभर
  8. बेकिंग पावडर चिमूटभर

सूचना

  1. उरलेली चपाती तव्यावर कडक् करून घ्या
  2. नंतर चपाती मिक्सरमधून बारीक करून घ्या
  3. परातीत तूप घेऊन फेसून घ्या
  4. नंतर त्यात रवा मैदा बेसन चपातीचा चुरा घालून मळून घ्या
  5. त्यात वेलची पूड व बेकिंग पावडर घालून पुन्हा एकदा मळून घ्या
  6. मळलेल्या पीठाचे गोळे करून 180 डिग्री सेल्सिअसवर 20 ते 25 मिनिटे बेक करा
  7. अतिशय सुंदर आणि वेगळ्या चवीची कुकीज तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर