मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटे चपाती कबाब

Photo of Chatpate Chapati Kebab by Renu Chandratre at BetterButter
711
2
0.0(0)
0

चटपटे चपाती कबाब

Jan-04-2019
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटे चपाती कबाब कृती बद्दल

शिळ्या पोळी आणि मिश्र भाज्यांचे खमंग कुरकुरीत कबाब, कोणाला शोधून पण नाही कळणार की यात शिळी पोळी वापरली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा, मुलांच्या किंवा किट्टी पार्टी ला स्टार्टर म्हणून सुद्धा खूपच छान।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. शिळ्या पोळ्या 4 ते 5
  2. उकडून मॅश केलेले बटाटे 2 ते 3
  3. मक्याचे दाणे क्रॅश करून 1 वाटी
  4. किसलेला गाजर 1 वाटी
  5. किसलेला भोपळा 1 वाटी
  6. मीठ चवीनुसार
  7. हळद 1/4 चमचा
  8. लाल तिखट 1 चमचा
  9. आले लसूण हिरवी मिरची पेस्ट 1 ते 2 चमचे
  10. गरम मसाला 1/2 चमचा
  11. काळी मिरी पावडर 1/2 चमचा
  12. ब्रेड क्रंब्स 1 मोठा चमचा
  13. तेल शॅलो फ्राय करायला

सूचना

  1. सर्वप्रथम शिळ्या पोळ्यांचे तुकडे करून , मिक्सर मधून बारीक करून घ्या
  2. एका मिक्सिंग बाउल मध्ये , बारीक केलेली पोळी, उकडून कुस्करलेला बटाटा, गाजर, मका,भोपळा, आले लसूण हिरवी मिरची पेस्ट, सर्व मसाले आणि चवीनुसार मीठ घ्या
  3. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करावे , पाणी घालू नये ।
  4. आवडीनुसार कबाब चा शेप द्या आणि ब्रेड क्रंब्स मधे हलक्या हाताने दाबून सगळी कडून घोळवून घ्या
  5. नॉन स्टिक तव्यावर , तेल घालून , दोनी बाजूने खरपूस तळून घ्यावेत
  6. टोमॅटो सौस किंवा हिरव्या चटणी बरोबर , लगेच गरमागरम सर्व्ह करावे ।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर