Photo of Shev khamni by Rohini Rathi at BetterButter
752
3
0.0(0)
0

सेव खमनी

Jan-04-2019
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सेव खमनी कृती बद्दल

सेव खमणी गुजराती पाककृतीचा प्रकार आहे उरलेल्या खमंग ढोकळा पासून बनवला आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले ढोकळ चे चार ते पाच तुकडे
  2. तेल एक चमचा
  3. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  4. हिरवी मिरचीची पेस्ट एक चमचा
  5. लसूण व आल्याची पेस्ट एक चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. सजवण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. बारीक शेव अर्धा कप
  9. लिंबाचा रस एक चमचा
  10. चिंचेची चटणी आवश्यकतेनुसार
  11. डाळींबाचे दाणे अर्धा वाटी

सूचना

  1. उरलेले खमंग एका भांड्यात काढून घ्यावे
  2. नंतरुन हाताने त्याचा बारीक चुरा करून कुस्करून घ्यावे
  3. कढईमध्ये तेल गरम करून राई जीरा हिंगाचा तडका घालावा
  4. नंतर त्यात हिरवी मिरची ची आणि लसणाची पेस्ट आल्याची पेस्ट घालून परतून घ्यावे
  5. नंतर कुस्करलेल्या खमंग चा चुरा घालून परतून घ्यावे
  6. लिंबाचा रस व मीठ चवीनुसार व एक चमचा साखर घालून मिश्रण झाकून दोन मिनिटे वाफवून घ्यावे
  7. तयार शेव खमणी वरती बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक शेव डाळिंबाचे दाणे व चिंचेची चटणी घालून सर करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर