मुख्यपृष्ठ / पाककृती / पावभाजी स्टफ

Photo of PavBhaji Stuff by Triveni Patil at BetterButter
396
3
0.0(0)
0

पावभाजी स्टफ

Jan-04-2019
Triveni Patil
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी स्टफ कृती बद्दल

बऱ्याच वेळा आपण पावभाजी करतो, आणी हिवळ्यात तर हमखास करतोच, मग ही पावभाजी शिल्लक राहते तर आपण ती सकाळी परत गरम करून खातो किंवा दाबेली बनवतो, पण आता या दाबेली ला एक छान आणी टेस्टी आँप्शन आलाय तो म्हणजे स्टफ पावभाजी एकदम टेस्टी आणी ईझी रेसिपी टि-टाईम स्नँक आँर माँर्नींग ब्रेकफास्ट लज्जतदार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. १.१ वाटी उरलेली पावभाजी.
  2. २. ५.६ ब्रेड स्लाईस.
  3. ३. ३ मिडीयम साईज बटाटे उकडून.
  4. ४. १. टि.स्पुन चिली फ्लेक्स.
  5. ५. १ टि.स्पुन मिक्स हर्बस् .
  6. ६. १. टि.स्पुन काळी मिरी पावडर.
  7. ७. अर्धी वाटी काँर्न फ्लाँर.
  8. ८. ब्रेड क्रम्स.
  9. ९. तळण्यासाठी तेल.
  10. १०. चवीपुरते मीठ.

सूचना

  1. १. सर्वात अगोदर एका बाऊल मध्ये ब्रेडच्या कडा कापुन बारिक चुरुन घ्या, मग यात ऊकडलेला बटाटा स्मँश करुन घाला.
  2. २. वरिल मिश्रणात १. टि.स्पुन चिली फ्लेक्स, १ टि.स्पुन मिक्स हर्बस्, १ टि.स्पुन काळी मिरी पावडर व चवी पुरते मिठ टाकुन मिश्रण छान एकजीव करुन घ्या.
  3. ३. पोळ्यांसाठी कणीक मळतो तशी कन्ससटंसी हवी.व १० मिनीटे झाकुन ठेवा.
  4. ४. दुसऱ्या साईडला एका कढईत बटर टाकुन पाव भाजी टाकुन परतुन घ्या, भाजी घट्ट व्हायला हवी १०/१५ मिनीटे भाजी परतुन बऱ्यापैकी घट्ट करुन गँस बंद करा. व पाव भाजी थंड होवु द्या.
  5. ५. आता तळव्यांना थोडे तेलाचा बोट लावुन अगोदर तयार केलेल्या ब्रेडच्या मिश्रणाचा लिंबा एव्हढा गोळा घेवुन त्याची हाताने पारी बनवा. या पारी मध्ये पाव भाजी स्टफ करुन गोल बाँल बनवुन घ्या.
  6. ६. पाव भाजीचे वरिल प्रमाणे सर्व बाँल बनवुन घ्या, एका बाऊल मध्ये काँर्न फ्लाँर घेवुन त्यात चवीपुरते मीठ व चिमुटभर काळी मिरी पावडर घालुन पाणी टाकुन पातळ स्लरी ( पेस्ट ) बनवुन तयार ठेवा.
  7. ७. एका कढईत तेल गरम करून तयार बाँल्स काँर्न फ्लाँर मध्ये डिप करुन ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात डिप फ्राय करा.
  8. ८. तयार आहेत गरम गरम पावभाजी स्टफ.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर