मुख्यपृष्ठ / पाककृती / Beauty parlour batti

Photo of Beauty parlour batti by Chayya Bari at BetterButter
40
5
0.0(2)
0

Beauty parlour batti

Jan-05-2019
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. उरलेली खोबरे घातलेली मेथीची भाजी 1 वाटी
 2. तीळ 2चमचे
 3. खसखस भाजलेली 1चमचा
 4. गव्हाचे पीठ 1 वाटी
 5. बाजरीचे पीठ 1वाटी
 6. बारीक रवा 2चमचे
 7. गरम तेल 2 चमचे मोहन
 8. ओवा 1 चमचा भाजलेला
 9. मीठ चवीनुसार
 10. शिळे वरण 1 वाटी
 11. चिंचेचा कोळ 1 चमचा
 12. गूळ चवीला
 13. तिखट,गरम मसाला प्रत्येकी 1चमचा
 14. जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता फोडणीला
 15. मेथी दाणे 7,8
 16. कोथिंबीर
 17. आले लसूण पेस्ट 1चमचा
 18. लसूण पाकळ्या तळलेल्या 7,8 सजावट
 19. तेल 1/4 वाटी बट्टी शेकण्यासाठी व वरणाच्या फोडणीसाठी

सूचना

 1. प्रथम गव्हाचे पीठ, रवा, बाजरीचे पीठ ,मीठ,ओवा ,हळद व गरम तेलाचे मोहन घालून चोळून घ्या व घट्ट भिजवून झाकून ठेवा 15 मिनिटे
 2. आता मेथीच्या भाजीत तीळ,खसखस घालून मिक्स करा भाजी बनविताना ओले खोबरे,लसूण,हिरवी मिरची पेस्ट घातली आहे त्यामुळे इतर काही घालू नये
 3. आता 15 मिनिटं झाली की पीठ चांगले मळून गोळा घ्यावा व त्याची वाटी करून त्यात मेथीची भाजी भरावी
 4. सर्व कडा नीट जुळवून सर्व बट्टी भरून घ्या
 5. नंतर पसरट कढईत 2 चमचे तेल टाकून पसरावा व मध्यम गॅसवर कढई तापली की सर्व बट्टी ठेवा
 6. झाकण ठेवा 5 मिनिटं झाली की बट्ट्या उलट करा बाजूने तेल सोडत जा
 7. आता बारीक गॅस करून दोन्ही बाजूने आलटून पालटून तेल सोडून बट्टी शेका नंतर कडा शेकण्यासाठी एक एक बट्टी आधाराने उभी करून शेका गरजेप्रमाणे तेल सोडा टूथपिक ने बट्टी शिजल्याची खात्री करा
 8. सर्व बट्टी झाली की पातेल्यात तेल गरम करा जिरे,मोहरी,हिंग,मेथीदाणे व कढीपत्ता घालून फोडणी करा व,2 वाळलेल्या लाल मिरच्या घाला गॅस बारीक करा तिखट ,गरम मसाला ,चिंचेचा कोळ ,गूळ घालून मिक्स करा व पटकन वरण घाला
 9. मिक्स करुन गरजेपुरते पाणी घालून चांगले उकळून घ्या कोथिंबीर घाला व गरम गरम बट्टी वर चिंचेची चटणी व तळलेल्या लसूण पाकळ्या घालून बट्टी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rohini Rathi
Jan-06-2019
Rohini Rathi   Jan-06-2019

Khup ch mast...nav tar innovative ahe lage ch recipe kay ahe baghnychi icha zali..nava pramne ch ahe ..

Vaishali Joshi
Jan-06-2019
Vaishali Joshi   Jan-06-2019

वाह वाह.. क्या बात है .. आणि नाव तर खूपच छान दिलंत !

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर