मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताचा रसगुल्ला ऑन फायर

Photo of Leftovef Rice Rasgulla On Fire by Aarti Nijapkar at BetterButter
8
3
0.0(0)
0

भाताचा रसगुल्ला ऑन फायर

Jan-06-2019
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताचा रसगुल्ला ऑन फायर कृती बद्दल

शिळ्या भातापासून रसगुल्ला करणार आहोत अगदी सोपी पद्धत थोडासा फायर टच दिला आहे रसगुल्ला झाल्यावर गरम तुपात त्याला तळून आगीचा भडका दिला आहे चवीला छान

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • फ्युजन
 • शॅलो  फ्रायिंग
 • बॉइलिंग
 • डेजर्ट
 • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

 1. उरलेला / शिळा भात २ वाट्या
 2. दुधाची पावडर १ मोठा चमचा
 3. मैदा १ लहान चमचा
 4. आरारूट पावडर १ लहान चमचा
 5. तुप १ मोठा चमचा
 6. पाक
 7. साखर १ १/२ वाटी
 8. पाणी ३ वाट्या

सूचना

 1. भाताची मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या
 2. ताटाला तूप लावून त्यावर भाताची भरड घाला व त्यात मैदा , आरारूट पावडर , दूध पावडर घालून चांगले मळून घ्या
 3. जेवढे चांगले मळाल तितके रसगुल्ले मऊसर होतील
 4. तयार मिश्रणाचे लहानसर गोळे करून ओलसर सुती कपड्याने ७ ते ८ मिनिटे झाकून ठेवा
 5. पाक
 6. गॅस वर पॅन ठेवा त्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळवून घ्या
 7. साखर विरघळेपर्यंत ढवळत राहा
 8. रसगुल्ले पाकात घालून मध्यम आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या
 9. रसगुल्ले पलटवून घ्या व मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजू द्या
 10. झालेले रसगुल्ले पाकातून ताटात काढून घ्या
 11. कढलं गरम करून त्यात तूप घाला व रसगुल्ले घालून मध्यम आचेवर मस्त फायरी तळून घ्या
 12. सर्व रसगुल्ले तळून झाले की त्यावर पुन्हा पाक घाला आणि सर्व्ह करा
 13. अश्याप्रकारे भाताचे रसगुल्ले तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर