मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या/शिळ्या भाकरीचा तिखट चुरा

Photo of Leftover Bhakri Spicy Chura by Aarti Nijapkar at BetterButter
2038
2
0.0(0)
0

उरलेल्या/शिळ्या भाकरीचा तिखट चुरा

Jan-06-2019
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या/शिळ्या भाकरीचा तिखट चुरा कृती बद्दल

भाकरी ही गरमागरम खाल्लेली उत्तम म्हणजे शिळी झाली की ती कडक होते व्यवस्थित खाता येत नाही तर त्यावेळेस हा उत्तम पर्याय आहे भाकरीचे तुकडे करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊन मग कांदा मिरची इतर मसाले घालून मस्त फोडणीदार थोडस पाणी शिंपडून वाफेवर गरमागरम भाकरीचा तिखट चुरा खाण्यास तयार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली / शिळी भाकरी २ मध्यम आकाराचे
  2. तेल १ मोठा चमचा
  3. जिरे १/४ लहान चमचा
  4. मोहरी १/४ लहान चमचा
  5. कडीपत्ता ४ ते ५ पाने
  6. हिंग १/४ लहान चमचा
  7. कांदा बारीक चिरलेला १ मोठा
  8. हिरव्या मिरच्या १ ते २
  9. कोथिंबीर बारीक चिरलेली १ मोठा चमचा
  10. हळद १/४ लहान चमचा
  11. लाल तिखट १/२ लहान चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. लिंबू कापलेला आवडीनुसार

सूचना

  1. प्रथम भाकरी घ्या त्याचे तुकडे करा
  2. मिक्सरच्या भांड्यात घाला
  3. भाकरी व्यवस्थित वाटून घ्या
  4. कढईत तेल घाला तेल तापले की त्यात जिरे मोहरी घाला व कडीपत्ता घाला चांगली तडतडली की त्यात चिरलेला बारीक कांदा व हिरव्या मिरच्या घालून परतवून घ्या
  5. कांदा छान लालसर परतवून झाला की त्यातचिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ , हळद, लाल तिखट व हिंग घालून परतवून घ्या
  6. आता बारीक वाटलेला भाकरीचा चुरा मसाल्यात घालून एकजीव करून घ्या मग त्यावर पाणी थोडे पाणी शिंपडून ५ मिनिटे वाफवून घ्या
  7. अश्याप्रकारे भाकरीचा तिखट चुरा खाण्यास तयार आहे हा ज्वारीच्या भाकरीचा तिखट चुरा आहे
  8. भाकरीच्या तिखट चुऱ्यावर थोडंस लिंबाचा रस पिळा व पाककृतीचा आस्वाद घ्या
  9. बाजरीच्या भाकरीचा तिखट चुरा आहे
  10. अश्याप्रकारे आवडत्या भाकरीचा तिखट चुरा करू शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर