Photo of Poli / Chapati Muthiya by Renu Chandratre at BetterButter
992
6
0.0(1)
0

Poli / Chapati Muthiya

Jan-06-2019
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टर फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. शिळ्या पोळ्या 4-5
  2. गव्हाचे पीठ 1 मोठा चमचा
  3. बेसन 1 मोठा चमचा
  4. तेल 2 ते 3 मोठे चमचे
  5. किसलेला दुधी 1 मोठा चमचा
  6. किसलेला गाजर 1 मोठा चमचा
  7. बारीक चिरलेला कांदा 1
  8. तीळ 2 चमचे
  9. हळद 1/4 चमचा
  10. लाल तिखट चवीनुसार
  11. मीठ चवीनुसार
  12. कढी पत्ता 10 ते 15
  13. मोहरी 1/2 चमचा
  14. आले हिरवी मिरची पेस्ट 1-2 चमचे
  15. दही 1 वाटी
  16. हिंग 2 चिमूट

सूचना

  1. सर्वप्रथम शिळ्या पोळ्यांचे तुकडे करावेत आणि मिक्सर मधून बारीक करून घ्या । एका परातीत आवडीनुसार मिश्र भाज्या आणि पोळी चा चुरा घ्या ।
  2. त्यात गव्हाचे पीठ, बेसन,आले हिरवी मिरची पेस्ट, हळद, तिखट मीठ आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करावे। तेलाचा हात करून , तयार पिठाचे मुठीया किंवा लांबट गोळे तयार करावे।
  3. स्टीमर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये 10-15 मिनिटे वाफवून घ्यावे
  4. मुठीया गार झाल्यावर , काप करून घ्या।
  5. कढईत तेल गरम करा, मोहरी, हिंग , तीळ आणि कढी पत्ता ची खमंग फोडणी करावी । त्यात मुठीया चे काप घालून , मंद आचेवर थोड्या वेळ परतून घ्यावे
  6. पोळीचे/ चपाती चे मुठीया तयार आहे । हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सौस बरोबर सर्व्ह करावे ।
  7. सोबत , गरमागरम चहा असेल तर अजून छान ।

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aarti Nijapkar
Jan-06-2019
Aarti Nijapkar   Jan-06-2019

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर