मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाजणीची जिरा कुकीस् अंड्याविना (माझी सेल्फ ईन्होवेटीव)

Photo of Eggless Jeera Cookies from Leftover Bhajni (Mine self innovative recipe) by Tejashree Ganesh at BetterButter
11
6
0.0(0)
0

उरलेल्या भाजणीची जिरा कुकीस् अंड्याविना (माझी सेल्फ ईन्होवेटीव)

Jan-06-2019
Tejashree Ganesh
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाजणीची जिरा कुकीस् अंड्याविना (माझी सेल्फ ईन्होवेटीव) कृती बद्दल

उरलेल्या चकली भाजणीपासून मी जिरा भिस्किटे बनवली आहेत, ही रेसिपी माझी स्वतः ची आहे. पीठ बांधण्या करिता गव्हाच्यापिठाचा वापर करून अतिशय चविष्ट व पौष्टीक पदार्थ बनविण्याचा एक लहान प्रयत्न...

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • बेकिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. भाजणी १ कप( मी चकलीची उरलेली भाजणी वापरली आहे.)
 2. गव्हाचे पिठ १ कप
 3. मिठ चविनुसार
 4. बेकींग पावडर १ लहान चमचा
 5. बेकींग सोडा १/४ लहान चमचा
 6. बटर १०० ग्रॅम +१ मोठा चमचा( रूम टेंम्पेचर)
 7. पिठी साखर १-१/२ मोठे चमचे किंवा आवडीनुसार.
 8. जिरे १ मोठा चमचा ( हवे तर क्रश करून घेऊ शकतो)
 9. दुध २-३ चमचे (आवश्यकतेनुसार)
 10. बटरपेपर

सूचना

 1. प्रथम दोन्हू पिठे तसेच बेकींग पावडर व बेकींग सोडा सर्व एकत्रित बाजूला काढून ठेवले.
 2. बटर, मिठ आणि साखर एका खोलगट बाऊल मधे घेतले.
 3. ह्याप्रमाणे बटर साखरेचे मिश्रण एकत्रित केले.
 4. ह्यामधे पिठ व जिरे टाकून घेतले व पुन्हा एकत्र करून घेतले.
 5. ह्याप्रमाणे
 6. नंतर ह्या मिश्रणाचा गोळा बनवला. ( जर मिश्रण कोरडे वाटले तर १-१ चमचा सावकाशपणे दुध टाकून गोळा बनवावा)
 7. बेकींग ट्रे मधे बटर पेपर लावला.
 8. एक गोळा घेतला.
 9. तो साधारण १/२ सेंमी. जाडीची पोळी लाटली.
 10. वरून थोडे जिरे भुरभूरले. ( ऐच्छिक)
 11. हलकेसे लाटणे फिरवले.
 12. आवडत्या कुकी-कटर च्या शेपने कुकीस् कट केल्या.
 13. सर्व कुकीस् बटरवपेपर लावलेल्या बेकींग ट्रे वर ठेवले.
 14. १८० डिग्री सेल्सिअसला प्रिहिट करून १० ते १५ मि. कुकीस् बेक केल्या.
 15. अत्यंत खुसखुशित, चविष्ट व पौष्टीक अशा कुकीस् तयार.. ह्याचे टेक्चर अत्यंत सुंदर आले आहे. आणि ह्या कुकीस् जिभेवर ठेवताक्षणी पगळतात.
 16. ५-१० मि. बाजूला काढून थंड होऊ दिल्या. व हवा बंद डब्यात ठेवून अठवडाभर छानही फ्रेश राहतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर