मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या चण्याची मसाला भाजी

Photo of Green chana masala by seema Nadkarni at BetterButter
998
1
0.0(0)
0

हिरव्या चण्याची मसाला भाजी

Jan-09-2019
seema Nadkarni
1470 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या चण्याची मसाला भाजी कृती बद्दल

कडधान्य च्या हिरव्या चण्याची मसाला भाजी केली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कडधान्याचे हिरवे चणे
  2. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
  3. 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
  5. 2-3 चमचा खसखस, खोबऱ्याची पेस्ट
  6. 1-2 चमचा लाल तिखट
  7. 1/4 टि स्पून हळद
  8. 1/2 चमचा जिरे
  9. चवी पुरते मीठ
  10. फोडणी साठी तेल
  11. 1 चमचा चना मसाला
  12. 1/2 चमचा चाट मसाला

सूचना

  1. सौ प्रथम हिरवे चणे 8-10 तास भिजत ठेवावे.
  2. 8-10 तासाने पाणी काढून टाकावे. व एका फडक्यात बांधून ठेवले की मोड येतात.
  3. या मोड आलेले हिरव्या चण्यात पाणी घालावे. व त्यात थोडी हळद, मीठ घालून 2-3 शीट्या काढावीत..
  4. मिक्सर च्या भांड्यात कांदे, टोमॅटो घालून प्युरी करून घ्यावे.
  5. एका कढईत तेल तापवून त्यात जीरे ची फोडणी करावी,
  6. त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यात कांदा टोमॅटो ची प्युरी घालून एकत्र करावे.
  7. त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे जिरे पावडर घालून तेल सुटेल पयॅत परतावे.
  8. शिजलेल्या चण्यात ले थोडे चणे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. व वरील मिश्रणात एकत्र करावे.
  9. व्यवस्थित परतून घ्यावे. शिजवून घेतलेल चणे घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून उकळी आणावी.
  10. शेवटी त्यात खसखस व खोबऱ्याची 2-3 चमचा पेस्ट घालून एकत्र करावे. म्हणजे ग्रेव्ही घट्ट होईल.
  11. एक उकळी आली की गॅस बंद करून, बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडे क्रिम घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर