मुख्यपृष्ठ / पाककृती / दाल पकवान

Photo of Daal pakwan by seema Nadkarni at BetterButter
266
2
0.0(0)
0

दाल पकवान

Jan-09-2019
seema Nadkarni
160 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल पकवान कृती बद्दल

हि पाक कृती सिंन्धी लोकांच्या घरात नास्तात बनवले जाते.

रेसपी टैग

 • एग फ्री
 • मध्यम
 • इतर
 • सिंधी
 • स्टीमिंग
 • फ्रायिंग
 • सौटेइंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

 1. डाळ साठी :-
 2. 1 कप चण्याची डाळ
 3. 1/4 टि स्पून हळद
 4. 1 चमचा लाल तिखट
 5. चवी पुरते मीठ
 6. फोडणी साठी तुप/तेल
 7. 1 चमचा जिरे
 8. 1/2 कप चींचे च पाणी
 9. 2-3 लाल सुकी मिरची
 10. 1 कप बारीक चिरलेला कांदा
 11. 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो
 12. बारीक चिरलेली कोथिंबीर
 13. पकवान साठी :-
 14. 1 कप मैदा
 15. 1/2 कप गव्हाचे पीठ
 16. 1/4 कप बारीक रवा
 17. 1/2 कप तेल मोहना साठी
 18. 1 चमचा ओवा
 19. 1/2 कप पाणी
 20. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. चण्याची डाळ 2 तास भिजत ठेवावे.
 2. सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
 3. कूकर मध्ये भिजवून घेतलेले चण्याची डाळ, हळद, मीठ व लाल तिखट घालून डाळ बूडेल इतके पाणी घालून कुकर 5 मिनिटे फुल गॅस वर व 5 मिनिटांनी मंद आचेवर 2-3 शीट्या काढावीत.
 4. आता एका भांड्यात मैदा, गव्हाचे पीठ व रवा एकत्र करून त्यात ओवा व तेलाचे मोहन घालून एकत्र करावे. थोडे थोडे पाणी घालून कणीक भिजवून घ्या.
 5. कणिक मळून 1/2 तास झाकून ठेवावे.
 6. एका कढईत तुप घालुन त्यात जीरे ची फोडणी करून त्यात लाल सुकी मिरची, वाटल्यास कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे.
 7. त्यात थोडे लाल तिखट घालून एकत्र करून शिवलेली चण्याची डाळ घालावी.
 8. शिजलेली चण्याची डाळ घालावी एक उकळी आली की गॅस बंद करावा. त्यात चिंचेचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.
 9. आता मैद्याचे कणीक चे छोटी छोटी गोळे करून घ्या.
 10. या गोळ्या ची पातळ पुरी लाटून घ्या. त्या पुरी वर काटे वाल्या चमच्याने टोचून घ्यावे.
 11. तेल तापवून त्यात सगळ्या पुर्या गुलाबी रंगाची तळून घ्यावे.
 12. कढईत पुरी घालून सतत हलवत राहावे म्हणजे सगळ्या बाजूने गुलाबी रंग येतो.
 13. तुम्ही अगोदर पण ह्या पकवान तळून ठेवु शकतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर