टोमॅटो सूप | Tomato soup Recipe in Marathi

प्रेषक BetterButter Editorial  |  31st Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Tomato soup by BetterButter Editorial at BetterButter
टोमॅटो सूप by BetterButter Editorial
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

753

0

टोमॅटो सूप recipe

टोमॅटो सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato soup Recipe in Marathi )

 • 750 ग्रॅम्स बारीक किसलेले / प्युरी केलेले टोमॅटो
 • 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
 • 1/3 कप जाड साय
 • 2 लसणाच्या पाकळ्या किसलेल्या
 • 1 मोठा चमचा मीठरहित बटर (लोणी)
 • 1 मोठा चमचा ऑलिव्ह तेल/बटर
 • 1+1/2 कप चिकन/भाजीचा रस किंवा त्यांना उकळविलेले पाणी
 • चवीसाठी ताजी दळलेली काळी मिरी
 • चवीनुसार मीठ
 • सजविण्यासाठी तुळशीची 4 ताजी पाने

टोमॅटो सूप | How to make Tomato soup Recipe in Marathi

 1. पॅन किंवा कुकिंग बाऊल घ्यावे , तेल व बटर एकत्र गरम करावे.
 2. चिमूटभर मीठासहित कांदा घालावा. कांदा पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवावे, यासाठी सुमारे 10-15 मिनिटे लागतील.
 3. आता किसलेली लसूण घालावी आणि 5 मिनिटे ती शिजू द्यावी. चांगले हलवत रहावे .
 4. किसलेले टोमॅटो घालावेत आणि त्यांचे रस पॅनमध्ये घालावेत . मध्यम आचेवर शिजवावे . टोमॅटो मिसळताना डाव किंवा चमचाच्या मागील बाजूचा वापर करावा.
 5. टोमॅटो मऊ होऊ लागतील, 10 मिनिटाच्या आसपास शिजवावे .
 6. आंच मंद करावी, चिकनचा रस किंवा पाणी ओतावे. ते मंद आचेवर गरम करावे आणि आणखी 15 मिनिटे शिजवावे .
 7. यानंतर पॅन आचेवरून काढावा आणि थंड होऊ द्यावा. जवळपास शिजलेल्या टोमॅटोची मऊ प्युरी बनविण्यासाठी हँड ब्लेंडरचा वापर करावा.
 8. या टप्प्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सूप पातळ करून घ्यावे, किंवा तसेच घट्ट ठेवावे.
 9. स्टोव्ह पेटवावा , टोमॅटो सूप पुन्हा पॅनमध्ये टाकावे आणि आंच मंद करावी . मलाई घालून चांगले ढवळून घ्यावे .
 10. चवीपुरती काळी मिरी व मीठ घालावे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार सूपची चव जुळवून घेऊ शकता .
 11. तुळशीच्या पानानी सजवून गरमागरम प्यायला द्यावे.

Reviews for Tomato soup Recipe in Marathi (0)