मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या दाण्यांची आमटी

Photo of Turichya Danyanchi Aamti by Vaishali Joshi at BetterButter
142
1
0.0(0)
0

तुरीच्या दाण्यांची आमटी

Jan-10-2019
Vaishali Joshi
480 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या दाण्यांची आमटी कृती बद्दल

तुरीच्या दाण्यांची आमटी खुप टेस्टी लागते , तुरीच्या शेंगा हिवाळ्यातच मिळतात आणि वाळलेले दाणे दुकानात १२ही महिने उपलब्ध असतात , तेव्हा केव्हाही ही आमटी करू शकतो , मि पण हि आमटी वाळलेल्या तुरीच्या दाण्यांची केली आहे .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. वाळलेले तुरीचे दाणे १ वाटि
 2. कांदा १
 3. टोमॅटो १
 4. हिरव्या मिरच्या ३-४
 5. आल लसूण पेस्ट २ चमचे
 6. कोथिंबीर
 7. तेल
 8. जिर
 9. मोहोरी
 10. तिखट
 11. हळद
 12. धणे पावडर
 13. काळा मसाला
 14. मिठ चवीनुसार

सूचना

 1. तुरीचे दाणे ७-८ तास पाण्यात भिजत घालून ठेवावे
 2. भिजलेले दाणे बाहेर काढून घेऊन थोड्या वेळ उपसून ठेवावे
 3. थोड्या तेलावर दाणे परतून घेऊन झाकण ठेवून अर्धवट शिजवून घ्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये पाणी घालून बारीक वाटून बाजूला ठेवा
 4. कांदा बारीक चिरून घ्या , आल+मिरची+लसूण+जिरे एकत्र पेस्ट करून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या टोमॅटो बारीक चिरून घ्या
 5. गॅस वर कढई तापत ठेवा आणि थोड जास्त तेल घालून ते तापल्यावर मोहरी घाला
 6. कांदा आणि मिरची + आल + लसूण + जिरे पेस्ट घालून परतावे , लालसर होईपर्यंत परतून घ्यावे आणि मग त्यात टोमॅटो बारीक चिरून घालावा व परतून घ्यावे
 7. तिखट , हळद , धणे पावडर व काळा मसाला घालून मिक्स करावे
 8. आता त्यात तुरीच्या दाण्यांचे वाटण घालून मिक्स करून घ्यावे आणि पाणी घालून ढवळावे
 9. एक दणदणीत वाफ येऊ द्यावी
 10. कोथिंबीर वरून भुरभुरावी आणि पोळी , भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी तुरीच्या दाण्यांची आमटी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर