मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी डाळ आणि क्यूनोआ हांडवो

Photo of Healty pulses and Quinoa Handvo by Archana Chaudhari at BetterButter
20
2
0.0(0)
0

हेल्दी डाळ आणि क्यूनोआ हांडवो

Jan-10-2019
Archana Chaudhari
960 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी डाळ आणि क्यूनोआ हांडवो कृती बद्दल

हा प्रोटिनयुक्त हेल्दी खूप छान लागतो.डब्यासाठी,व्यायाम करणाऱ्यांसाठी,सगळ्यांसाठीच छानच....

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • गुजरात
 • पॅन फ्रायिंग
 • ब्लेंडींग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. क्यूनोआ १/२ कप
 2. हरभरा डाळ १/२ कप
 3. उडीद डाळ १/२ कप
 4. सालांची मूग डाळ १/२ कप
 5. मटकीची डाळ १/४ कप
 6. दही १ टेबलस्पून
 7. रवा १/२ कप
 8. पट्टाकोबी १ कप किसलेला
 9. गाजर १ कप किसलेला
 10. कांदा मध्यम लांब चिरलेला
 11. आले,लसूण, हिरवी मिरची पेस्ट २ टीस्पून
 12. तिखट १ टीस्पून
 13. हळद १/२ टीस्पून
 14. मीठ चवीनुसार
 15. तेल २ टेबलस्पून पॅनमध्ये टाकण्यासाठी
 16. फोडणीसाठी
 17. तेल २टीस्पून
 18. मोहरी १टीस्पून
 19. जिरे १/२ टीस्पून
 20. हळद १/४ टीस्पून
 21. हिंग १/२ टीस्पून

सूचना

 1. क्यूनोआ,सगळ्या डाळी वेगवेगळ्या धुवून वेगवेगळ्या भांड्यात पाणी घालून ४ तास भिजवा.
 2. आता पाणी निथळून घेऊन, मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
 3. एका भांड्यात एकत्र करा.
 4. त्यात दही आणि रवा घालून छान एकत्र करून रात्रभर आंबविण्यासाठी ठेवा.
 5. आता त्यात पत्ताकोबी, गाजर,कांदा, आले,लसूण,मिरचीची पेस्ट,हळद,तिखट घाला.
 6. एका छोट्या कढईत तेल टाकून फोडणी तयार करून घ्या.
 7. वरील मिश्रणात फोडणी आणि मीठ घाला.
 8. छान एकत्र करुन घ्या.
 9. तव्यावर किंवा पॅनमध्ये जाड हांडवो पसरवा.
 10. झाकण ठेवा.
 11. तेल टाकून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या.
 12. चटणी,सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर