मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ मुळा भाजी

Photo of Daal Mula Bhaji by Chayya Bari at BetterButter
1546
5
0.0(0)
0

डाळ मुळा भाजी

Jan-10-2019
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ मुळा भाजी कृती बद्दल

मुळा बहुतेकांना आवडत नाही पण तो गुणकारी व फायदेशीर आहे. चना डाळ टाकून केलेली ही भाजी नक्कीच चविष्ट होते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक चिरलेला मुळा २ वाट्या
  2. ४तास भिजलेली चाना डाळ १वाटी
  3. मुळ्याचा कोवळा पाला चिरून २ वाट्या
  4. हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट १चमचा
  5. दाण्याचे कूट २चमचे
  6. शेंगदाणे २चमचे
  7. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  8. हळद १चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल ३चमचे

सूचना

  1. प्रथम मुळा, पाला, डाळ स्वच्छ धुवून घ्यावी
  2. २चमचे तेल तापवून जिरे मोहरी हिंग फोडणी करावी शेंगदाणे खरपुस परतावे व हिरवी मिरची आले लसूण पेस्ट परतावी.हळद,मीठ घालावे
  3. आता मुळा,पाला,डाळ घालून परतावे मंद गॅसवर झाकण घालून १,२वाफ्फा घ्याव्या डाळ बोटचेपी होईस्तोवर शिजवावी
  4. गरज असेल तर पानी शिंपडावे भाजी तयार झाली की शेंगदाणा कूट घालून मिक्स करावे व १चमचा तेल बाजूने सोडून मिक्स करावे व उतरून घ्यावे
  5. गरम गरम सर्व्ह करावी
  6. आता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर