मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाबीन आणि वाटाणे भाजी वडा

Photo of Soyabean aani Vatane Bhaji Vada by Vaishali Joshi at BetterButter
1851
4
0.0(0)
0

सोयाबीन आणि वाटाणे भाजी वडा

Jan-11-2019
Vaishali Joshi
480 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाबीन आणि वाटाणे भाजी वडा कृती बद्दल

खुप हेल्दी आणि टेस्टी भाजी वडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सोयाबीन चे दाणे १/२ वाटी
  2. वाटाणे ३/४ वाटी
  3. बेसन २ -३ चमचे
  4. पानकोबि बारीक चिरलेली १ वाटी
  5. कांदा १ बारीक चिरलेला
  6. पालक १वाटी बारीक चिरलेला
  7. आल मिरची जिरे हिंग यांचा ठेचा २ चमचे
  8. तिखट आवडीनुसार
  9. धणे पावडर १ चमचा
  10. गरम मसाला १ चमचा
  11. मिठ चवीनुसार
  12. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सोयाबीन चे दाणे आणि वाटाणे वेगवेगळ्या भांड्यात पाणी घालून ७-८ तास भिजत घालून ठेवावे
  2. भिजल्यावर पाण्यातुन काढून घेऊन मिक्सर मध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे
  3. त्यात चिरलेला कांदा , पालक , पानकोबी आणि बेसन घालून मिक्स करावे
  4. आता त्यात तिखट , धणे पावडर , गरम मसाला , आलं मिरची जिरे हिंग यांचा ठेचा , २ टि स्पून तेल आणि चविनुसार मीठ घालून चांगले एकत्र करावे
  5. त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून हाताने हलकेसे प्रेस करून वडे करून घ्यावे
  6. गॅस वर कढईत तेल घालून ते गरम झाले की त्यात एक एक करून वडे अर्धवट तळुन घ्या आणि बाहेर काढून घ्या
  7. थोड थंड झाल्यावर वड्याला हाताने प्रेस करून घ्यावे
  8. मग पुन्हा गरम तेलात मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत
  9. अशा प्रकारे सर्व वडे तळून घ्यावे आणि सर्व्ह करण्यासाठी तयार टेस्टी असे सोयाबीन आणि वाटाणयाचे भाजी वडे आवडीनुसार सॉस किंवा तळलेल्या मिरची सोबत सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर