मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या चण्याचं हिरवगार कालवण

Photo of Green Chana With Green Gravy by Tejashree Ganesh at BetterButter
12
2
0.0(0)
0

हिरव्या चण्याचं हिरवगार कालवण

Jan-13-2019
Tejashree Ganesh
750 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या चण्याचं हिरवगार कालवण कृती बद्दल

ह्या पाककृती करिता मी हिरवे चणे वापरले आहेत. हिरवा हरभरा बाजारात येऊ लागला की त्याच्या ताज्या दाण्यांची ही भाजी अप्रतिम लागते, परंतू वर्षभर ताजा हरभरा मिळणे अशक्य असल्याने वाळलेला हिरवा हरभरा बाजारात मिळतो. तेव्हा ह्याप्रकारे हिरवी भाजी केव्हाही करू शकतो.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. हिरवा चणा १/२ कप
 2. हिरव्या कमी तिखट मिरच्या ३-४
 3. पुदिना १ ते दिड कप
 4. कोथिंबीर १ ते दिड कप
 5. कढिपत्ता १/२ कप
 6. कांदा १
 7. लसून पाकळ्या ३-४
 8. आलं १ ईंच
 9. तेल ३-४ मोठे चमचे
 10. मिठ
 11. गरम मसाला १ मोठा चमचा.
 12. शिजण्याकरिता पाणी

सूचना

 1. सर्वप्रथम हिरवे चणे १२-१३ तास भिजत घातले.
 2. न भिजलेले चणे बाजूला काढून भिजलेले चणे मिठ टाकून कुकरमधे शिजायला टाकले.
 3. ३-४ किंवा आवश्यकतेनुसार शिट्या घेऊन चणे शिजवून घेतले.
 4. ह्या प्रकारे सर्व साहित्य एका प्लेटमधे बाजूला काढून घेलते.
 5. हिरवा मसाला तयार करून घेतला, ह्यामधे सर्व हिरव्या जिन्नस टाकून मिक्सरमधून बारिक करून घेतले व बाजूला ठेवले.
 6. हिरवा मसाला बाजूला काढून त्याच मिक्सरमधे कांदा, आलं-लसून बारिक करून घेतले. (एकाच मिक्सरमधे केल्याने हा मसाला हिरवा दिसत आहे.)
 7. कढईमधे तेल तापवून घेतले.
 8. त्यात सर्वप्रथम कांद्याचा मसाला टाकला व चांगले परतून घेतले.
 9. नंतर ह्यामधे हिरवा मसाला टाकून परतून घेतले.
 10. त्यानंतर हळद टाकली.
 11. मसाला व्यवस्थित परतून घेतला.
 12. शिजलेले चणे टाकून परतून घेतले.
 13. चण्याचे उरलेले पाणी चण्याच्या भाजीमधे टाकून कालवण शिजू दिले.
 14. उकळी आली की गरम मसाला व मिठ टाकले. (ह्या ठिकाणी मिठ आवश्यकतेनुसारच टाकावे कारण चणे शिजवताना मिठ टाकून शिजवलेले असतात)
 15. हिरव्या चण्याचे हिरवेगार कालवण तयार... हे कालवण कुठल्याही भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही चविष्ट लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर