मुख्यपृष्ठ / पाककृती / ढाबा स्टाईल मसालेदार तडकावाली डाळ खिचडी

Photo of Dhaba Style Masaledar Tadkewali Dal Khichdi by Manisha Lande at BetterButter
954
2
0.0(0)
0

ढाबा स्टाईल मसालेदार तडकावाली डाळ खिचडी

Jan-14-2019
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढाबा स्टाईल मसालेदार तडकावाली डाळ खिचडी कृती बद्दल

पटकन होणारी मसालेदार, चविष्ट आणि चमचमीत डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी मुगाची डाळ
  2. १/२ वाटी तांदूळ
  3. २ मोठे चमचे साजुक तुप
  4. २ मोठे बारीक चिरलेले कांदे
  5. १ मध्यम बारीक चिरलेला टोमॅटो
  6. १ मोठा चमचा आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट
  7. ७ ते ८ कढीपत्याची पानं
  8. २ ते ३ लाल सुक्या मिरच्या
  9. १/२ छोटा चमचा हळद
  10. १ छोटा चमचा लाल तिखट
  11. १ छोटा चमचा धने-जीरे पुड
  12. १/४ छोटा चमचा जिरं
  13. १/४ छोटा चमचा मोहरी
  14. १/४ छोटा चमचा हिंग
  15. १ मोठा चमचा तेल
  16. चवीनुसार मीठ
  17. १ छोटा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम तांदूळ व मुगाची डाळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून ५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवले.
  2. प्रेशर कुकर मध्ये भिजवलेले तांदूळ, मुगाची डाळ, हळद व चवीनुसार मीठ घालून तांदूळाच्या दुप्पट गरम पाणी घालुन ३ शिट्ट्या काढून डाळ तांदूळ शिजवून घेतले व नंतर त्यात थोडं पाणी घालुन छान घोटून घेतलं.
  3. कढईत तेल गरम करून तेल तापल्यावर त्यात हिंग, मोहरी, घालुन ते तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा व आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट घालून छान कांदा सोनेरी रंगावर भाजून घेतला.
  4. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट व धने-जीरे पुड घालून सर्व छान एकजीव करून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं.
  5. नंतर त्यात घोटलेली डाळ-तांदूळाची खिचडी घालून छान एकजीव करून मंद आचेवर वाफ येईपर्यंत शिजत ठेवली.
  6. एका भांड्यात तुप गरम करून त्यात जिरं, लाल सुक्या मिरच्या, व कढीपत्याची पानं घालुन फोडणी छान खमंग होईपर्यंत गरम केली.
  7. तयार फोडणी खिचडीवर घालून सर्व छान एकजीव करून घेतले.
  8. तयार खिचडी सर्व्हींग डिशमध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व फोडणीची लाल सुकी मिरची ठेवून गरमागरम सर्व्ह केली.
  9. "ढाबा स्टाईल मसालेदार तडकावाली डाळ खिचडी" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर