मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत पंचरत्न चिवडा सोबत फक्कड चहा

Photo of Five lentils Mixture with Fakkad Tea by Tejashree Ganesh at BetterButter
45
3
0.0(0)
0

चटपटीत पंचरत्न चिवडा सोबत फक्कड चहा

Jan-17-2019
Tejashree Ganesh
540 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत पंचरत्न चिवडा सोबत फक्कड चहा कृती बद्दल

ह्या पाककृतीमधे कुठल्याही पाच प्रकारच्या डाळी किंवा कडधान्य मिक्स वापरू शकतो. चहाच्या वेळेला किंवा पार्टीमधे चटपटीत, अगदी लहान मुलांनाही खुप आवडेल अशी ही पाककृती.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. पांढरा चणा १/४ कप
 2. हरभरा डाळ २ मोठे चमचे
 3. अख्खी मसूर २ मोठे चमचे
 4. मुगदाळ ३ मोठे चमचे
 5. मठाची डाळ २ मोठे चमचे
 6. शेंगादाणे मुठभर (optional)
 7. पाणी
 8. तळण्याकरिता तेल
 9. लाल तिखट चविनुसार
 10. मिठ चविनुसार
 11. चाट मसाला १-२ चमचे अावडीनुसार

सूचना

 1. सर्व डाळी व कडधान्य स्वच्छ निवडून, धुवून ७-८ तास पाण्यात भिजत ठेवव्यात. मुगडाळ व मठाच्या डाळीला ३ तास ठेवले तरी चालते.
 2. चणे अर्धवट शिजवून घ्यावे.
 3. डाळींमधील पाणी काढून सर्व डाळी फॅन खाली ३० मि. सुकत ठेवाव्यात.
 4. कढईत तेल तापत ठेवावे व एक-एक डाळी व चणे व्यवस्थित तळून घ्यावे.
 5. किचन टॉवलचा वापर करून जास्तिचे तेल काढून सर्व तळण कोरडे करावे.
 6. सर्व एका बाऊल मधे काढून घ्यावे.
 7. त्यावर तिखट, मिठ, चाट मसाला सर्व ह्या मिश्रणात टाकावे.
 8. व्यवस्थित एकत्र करून serve करावे किंवा हवाबंद डब्यात ठेवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर