मुख्यपृष्ठ / पाककृती / चना मसाला

Photo of Chana masala by जयश्री जोशी at BetterButter
38
3
0.0(0)
0

चना मसाला

Jan-18-2019
जयश्री जोशी
480 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना मसाला कृती बद्दल

मी नेहमी असे चना मसाला बनवते

रेसपी टैग

 • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

 1. १कप चने
 2. २ टोमॅटो
 3. २ कांदे
 4. १ कांडी लसूण
 5. २हिरव्या मिरच्या
 6. १/२" आल
 7. १चमचा तिखट
 8. १ चमचा गरम मसाला
 9. चवीनुसार मीठ
 10. फोडणीचे सर्व साहित्य
 11. २टेबल स्पून तेल
 12. १ टी स्पून साखर
 13. थोडी कोथिंबीर

सूचना

 1. रात्री चने (हरबरे) भिजत घालावे
 2. सकाळी ते उपसून स्वच्छ धुवून घ्यावे
 3. थोडे मीठ व हळद घालून तसेच थोडे पाणी घालून कुकर मध्ये शिजवून घेणे
 4. ४ते५शिटी घेणे
 5. कांदा चिरून तो चांगला गुलाबी रंगावर शिजवणे
 6. नंतर त्यात टोमॅटो पण बारीक चिरून ताकने
 7. त्यातच हिरवी मिरची तुकडे करून, लसूण व आले घालून चांगले शिजू देणे
 8. नंतर ते सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे
 9. नंतर जरा मोठी कडाई गॅसवर ठेवून फोडणी तयार करून त्यात वाटलेला मसाला चांगला परतवून घेणे त्यातच थोडी साखर ,तिखट, गरम मसाला व चवीनुसार मीठ घाला
 10. मसाला चांगला परतला की बाजूने तेल सुटते
 11. तेल सुटल्यानंतर त्यात शिजवलेले चणे ताकने त्यातच थोडे पाणी पण ताकणे व चांगले उकळी येवू देणे
 12. रस्सा जरा घट्ट झाल्यानंतर गास बंद करून थोडी कोथिंबीर वरून घाला
 13. चना मसाला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर