मुख्यपृष्ठ / पाककृती / दामटीचे लाडू

Photo of Damati laddoo by Swapnal
swapna p at BetterButter
18
3
0.0(0)
0

दामटीचे लाडू

Jan-18-2019
Swapnal swapna p
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दामटीचे लाडू कृती बद्दल

हरभऱ्याच्या डाळीचे पीठ यापासून पुऱ्या(दामट्या) बनवुन तुपात तळून त्यापासून लाडू बनवले आहेत या लाडूंना बुंदीचा लाडू पेक्षा तूप कमी लागते त्यामुळे हे डायट लोकांसाठी उत्तम लाडू आहेत

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. एक वाटी बेसन
 2. एक टेबल स्पून रवा
 3. तूप
 4. वेलची पावडर
 5. खायचा पिवळा रंग
 6. एक वाटी साखर

सूचना

 1. बेसन पीठ रवा एक चमचा तूप खायचा रंग हे घालून कणकेसारखे पीठ मळून घ्यावे
 2. मळलेले पीठ दहा मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवावे
 3. एक वाटी साखरेत साखर भिजेल इतपत पाणी घालून त्याचा गोळीबंद पाक करावा
 4. बेसनाच्या मळलेल्या पिठाचा छोट्या छोट्या पुऱ्या करून
 5. एका कढईत तूप गरम करायला ठेवावे
 6. फळीतले तापलेल्या तुपात एकेक पुरी सोडून तळून घ्यावी
 7. तळलेल्या पुऱ्या हाताने चुराव्यात किंवा मिक्सरमधून रवाळ बारीक करावेत
 8. हे पुऱ्यांचे रवाळ पीठ एका मोठ्या परातीत काढावे व त्यात लागेल असा पाक घालावा
 9. पा घातल्यानंतर सगळ मिक्स करून त्यात वेलची पावडर घालावी
 10. सगळं मिश्रण मिक्स करून त्याचे लाडू वळावेत
 11. खाण्यासाठी तयार आहे पौष्टिक हेल्दी दामटीचे लाडू तयार आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर