मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट पंचमेळ दाळ

Photo of Panchmel Daal by Tejashree Ganesh at BetterButter
336
2
0.0(0)
0

झटपट पंचमेळ दाळ

Jan-19-2019
Tejashree Ganesh
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट पंचमेळ दाळ कृती बद्दल

ही एक राजस्थानी पाककृती असून ह्या पाककृती मधे पाच प्रकारच्या डाळी वापरल्या आहेत, तसेच ही झटपट केलीली पाककृती आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • राजस्थान
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. तुर दाळ १ चमचा
  2. मुग दाळ १ चमचा
  3. मसूर दाळ १ चमचा
  4. हरभरा दाळ १ चमचा
  5. उडिद दाळ १ चमचा
  6. पाणी
  7. कांदा १ लहान
  8. टोमॅटो २ लहान
  9. हिरवी मिरची २
  10. आलं १ ईंच
  11. लसून पाकळ्या ३-४
  12. तेल २ चमचे
  13. तमालपत्र १-२
  14. लाला अख्खीमिरची २
  15. हळद १/२ चमचा
  16. लाल तिखट १ चमचा
  17. गरम मसाला १ चमचा
  18. आमचूर पावडर १ चमचा
  19. धनेपुड १ चमचा
  20. हिंग चिमुटभर
  21. मिठ
  22. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम सर्व दाळी स्वच्छ धुवून कुकर मधे शिजवून घ्याव्यात.
  2. एका बाजूला मिक्सरमधे कांदा,टोमॅटो, आलं,लसून ,मिरच्या हे साहित्य टाकावे. व त्याची बारिक पेस्ट तयार करून घ्यावी.
  3. बाजूला एका जाड बुडाच्या कढईमधे तेल टाकून बारिक केलेला मसाला टाकावा. बाजूने तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यावा.
  4. सर्व मसाले एका वाटीत काढून घ्यावे व ते मसाल्यामधे टाकून परतून घ्यावेत. ह्यावेळी गॅस कमी ठेवावा.
  5. मसाला चांगला परतावा व त्यात मिठ घालावे.
  6. मसालामधे शिजलेली दाळ किंवा शिजलेल्या दाळीच मसाला टाकावा, कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
  7. बाजूला तुपाची फोडणी तयार करावी व त्यात तमालपत्र व मिरची टाकावी व लगेच ती फोडणी दाळीमधे ओतावी.
  8. दाळ थोडी गरम करून रोटी किंवा राईस बरोबर serve करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर