BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ चिकोल्या

Photo of Daal chikolya by Chayya Bari at BetterButter
0
3
0(0)
0

डाळ चिकोल्या

Jan-20-2019
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ चिकोल्या कृती बद्दल

ही लोकप्रिय महाराष्ट्रीयन रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तुरीची डाळ १/४वाटी
  2. हरबरा डाळ २चमचे
  3. कढीपत्ता
  4. कोथिंबीर
  5. कांदा १
  6. मिरची २
  7. लसूण पाकळ्या ८,१०
  8. चिंच गूळ चवीला
  9. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  10. ओवा १चमचा
  11. कणीक ३वाट्या
  12. तेल १/४वाटी
  13. हळद १चमचा
  14. तिखट १चमचा

सूचना

  1. प्रथम डाळी धुवून पाण्यातच ठेवा
  2. आता कणीक घेवून त्यात चवीला मीठ,ओवा व २चमचे तेल घालून पीठ घट्ट मळून घ्या व झाकून ठेवा
  3. आता फोडणीची तयारी करा
  4. तेल तापवून त्यात मोहरी , जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करा आता मिरच्या चिरून,लसूण चिरून घाला
  5. लसूण लालसर झाला की कांदा घालून परतून घ्या आता तिखट,हळद,घालून डाळी घाला
  6. छान मिक्स करून उकळते पाणी घाला डाळ शिजू द्या
  7. तोवर पिठाची मोठी पोळी लाटून सुरीने चौकोनी चिकोल्या कापून घ्या
  8. डाळ बोटाने शिजली का पाहा आता,चिंच ,मीठ व गूळ
  9. डाळ शिजत आली की उकळत्या डाळीत चीकोल्या सोडा
  10. ४,५ चिकोळ्या सोडत चला उकळी सतत चालू पाहिजे थांबता कामा नये
  11. म्हणून भराभर चिकॉल्या सोडू नये
  12. गरज वाटली तर साईडने उकळते पाणी सोडू शकता
  13. सर्व चिकोल्य सोडून झाल्यावर छान हलवून १०मिनिटे शिजू द्यावा
  14. शिजल्यावर कोथिंबीर घाला फोडणीचे तेल किंवा तूप घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर