मुख्यपृष्ठ / पाककृती / कडधान्याची कच्ची दाबेली

Photo of Mix sparaots kcchi dabeli by Anita Bhawari at BetterButter
56
4
0.0(0)
0

कडधान्याची कच्ची दाबेली

Jan-20-2019
Anita Bhawari
60 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडधान्याची कच्ची दाबेली कृती बद्दल

कडधान्यांचा आपण सुकी भाजी पातळ रस्सा मिसळ किंवा मिक्स कटलेट करतो पण आज आपण कडधान्यांची दाबेली करणार आहोत

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • स्टीमिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. सहा ते सात उकडलेले बटाटे
 2. एक वाटी मिक्स कडधान्य
 3. गोड चटणी तिखट चटणी
 4. दोन लादी पाव
 5. बारीक चिरलेला कांदा
 6. बारीक चिरलेली कोथिंबीर
 7. एक वाटी अमूल बटर
 8. बारीक पिवळी शेव
 9. भाजलेले शेंगदाणे
 10. डाळिंब
 11. दोन ते तीन चमचे तेल
 12. दोन चमचे पावभाजी मसाला पावडर
 13. गरम मसाला लाल तिखट
 14. चवीनुसार मीठ
 15. चेरी
 16. चाट मसाला
 17. पाणी

सूचना

 1. कुकरमध्ये पाच ते सहा बटाटे व कडधान्य मी टाकून शिजवून घ्या
 2. कढई तापवून एक चमचाभर तेल घाला त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाका हळद लाल तिखट चाट मसाला मीठ हे सर्व पाच मिनिटात परतवून घ्या आपले मसाला शेंगदाणे तयार
 3. आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल एक चमचा बटर घालू पाव भाजी मसाला टाका थोडं लाल तिखट टाका बटाटे कुस्करून घाला एक वाटी शिजवलेले कडधान्य घाला व चांगले मिक्स करा आता एक वाटीभर पाणी घाला झाकण ठेवून एक वाफ काढा
 4. छोट्या पातेल्यामध्ये दोन वाटी पाणी घ्या त्यामध्ये ओले खजूर चिंच काळे मीठ टाका व चांगली उकळी येऊन द्या थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या आपली गोड आंबट चटणी तयार
 5. कोथंबीर आलं लसुन ही मिरची हरी मिरची थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे आपली हिरवी तिखट चटणी तयार
 6. पावाला मधोमध कट करून घ्या अमुल बटर लावून घ्या दोन्ही बाजूने गोड व तिखट चटणी लावा आपण केलेली भाजी त्यामध्ये भरा पुन्हा चटणी टाका तळलेले शेंगदाणे भरा बारीक चिरलेला कांदा भरा व पाव दाबा
 7. तवा गरम करून दोन्ही बाजूंनी पावला बटर लावून पाव गरम करून घ्या
 8. अशा प्रकाराने सगळं पदार्थ तयार करून ठेवा
 9. भाजी तयार झाल्यावर स्टीलचा ताटामध्ये काढून घ्या वरतून मसाला शेंगदाणे चेरी मसाला शेंगदाणे कोथिंबीर बारीक शेव वरतून घालून सजावट करून घ्या दाबेली तयार करण्याच्या आधी अशी तयारी करून ठेवावी म्हणजे पाहुणे आल्यावर पटकन करता येईल
 10. दाबेली गरम झाल्यावर आत मध्ये डाळिंब व कांदा भरून बारीक शेव मध्ये चारी बाजूने घोळवून घ्या आपली कडधान्याची कच्ची दाबेली तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर