मुख्यपृष्ठ / पाककृती / इनोव्हेटिव्ह स्टफ्ड राजमा गोळा भात

Photo of Innovative stuffed rajma Gola Bhat by Chayya Bari at BetterButter
449
5
0.0(0)
1

इनोव्हेटिव्ह स्टफ्ड राजमा गोळा भात

Jan-20-2019
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इनोव्हेटिव्ह स्टफ्ड राजमा गोळा भात कृती बद्दल

गोळा भात ही विदर्भातील लोकप्रिय रेसिपी .मी गोळा भात नेहमीच बनविते पण स्पर्धेसाठी इनोव्हेटिव्ह गोळा भात बनवायचे ठरविले आणि मिशन सक्सेसफुल! भारीच टेस्टी झाला सर्वांनी फस्त केला

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गोळे स्टफ्फिंगसाठी गाजर किस 1वाटी
  2. तीळ 1चमचा
  3. जिरे 1चमचा
  4. तिखट 1चमचा
  5. तेल 1चमचा
  6. मीठ चवीप्रमाणे
  7. हिरवी मिरचीची तुकडे एे च्छिक
  8. गोळ्याचे कव्हर बटाटा 1
  9. राजमा भिजवून शिजवलेला 1 वाटी
  10. बेसन 2चमचे
  11. तिखट 1चमचा
  12. मीठ चवीप्रमाणे
  13. हळद 1चमचा
  14. तेल तळण्यासाठी
  15. भातासाठी शिजवलेला भात 2 वाट्या
  16. भिजवून उकडलेला राजमा 1/2वाटी
  17. तमालपत्र,मिरे,दालचिनी फोडणीसाठी
  18. जिरे 1चमचा
  19. तिखट 1चमचा
  20. हळद 1/2चमचा
  21. गरम मसाला 1चमचा
  22. मीठ चवीप्रमाणे
  23. कोथिंबीर
  24. तेल 4चमचे

सूचना

  1. प्रथम कुकरमध्ये भात बटाटा व गोळे कव्हर चा राजमा शिजवून घ्यावा
  2. गाजराच्या किसला तेल तापवून जिरे,मिरची,तीळ घालून फोडणी करावी परतून तिखट,मीठ,घालून परतून काढून घ्यावे
  3. आता भाताचा राजमा उकळत्या पाण्यात टाकून बोटचेपी शिजवून घ्यावा जास्त मऊ करू नये
  4. आता गोळ्याचा राजमा, बटाटा कुस्करून त्यात बेसन ,तिखट,मीठ घालून मिक्स करावे
  5. आता त्याची पारी करून त्यात गाजराचे मिश्रण स्टफ करावे
  6. याप्रमाणे सर्व गोळे बनवावे
  7. तयार गोळे गरम तेलात टाकावे 3 मिनिटं झाल्यावर मंद गॅसवर नीट तळून काढून घ्यावे
  8. आता भाताची तयारी
  9. तेल तापवून त्यात जिरे ,मिरे,दालचिनी घालावी मग तमालपत्र घालावे मग तिखट,हळद,गरम मसाला व थोडे मीठ घालून मिक्स करावे
  10. मग त्यात शिजलेला राजमा घालून मिक्स करावे व शिजलेला भात घालून मिक्स करावे व वाफ घ्यावी
  11. मग तयार गोळे भातात घालून छान परतून आणखी एक वाफ घ्यावी गोळा भात तयार कोथिंबीर घालून कढी किंवा चिंच चटणी बरोबर सर्व्ह करावा तळलेले काजू घालून सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर