Photo of Daal karanji by Susmita Tadwalkar at BetterButter
865
2
5.0(0)
0

Daal karanji

Jan-21-2019
Susmita Tadwalkar
150 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी हरभरा डाळ
  2. ५-६ हिरव्या मिरच्या
  3. फोडणीचे साहित्य
  4. मिठ, साखर चवीनुसार
  5. १ वाटी तेल
  6. चिरलेली कोथिंबीर
  7. बारीक चिरलेला कांदा
  8. सारणासाठी~~~
  9. १ वाटी कणिक
  10. १/२ वाटी बारीक रवा

सूचना

  1. हरभरा डाळ धुवून २ तास भिजत घाला
  2. पाणी काढून घ्या व हिरव्या मिरच्यांबरोबर थोडी जाडसर वाटून घ्या
  3. तेल गरम करून फोडणी करा व वाटलेली डाळ घालून परतावे आणि चांगली वाफ आणावी, चिरलेली कोथिंबीर घालावी
  4. वाटली डाळ तयार झाली
  5. सारणासाठी कणिक, रवा एकत्र करून चिमूटभर मीठ घालून मिक्स करा
  6. २ चमचे कढत तेल घालून मिक्स करा
  7. पाणी घालून थोडी घट्ट भिजवून घेऊन थोडा वेळ झाकून ठेवा
  8. कणिक निट मळून घ्यावी व छोटे गोळे करून घ्यावे
  9. एक गोळा घेऊन पुरी लाटावी व त्यावर चिरलेला कांदा पसरावा
  10. आता त्यावर एक चमचा वाटली डाळ घालून करंजीचा आकार द्यावा
  11. सर्व करंज्या लाटून झाल्यावर मध्यम आचेवर तळून घ्यावे
  12. गरमागरम सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर