मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स मसाला दाल

Photo of Mix masala dal by seema Nadkarni at BetterButter
664
2
0.0(0)
0

मिक्स मसाला दाल

Jan-21-2019
seema Nadkarni
45 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स मसाला दाल कृती बद्दल

मिक्स डाळी मध्ये प्रोटीन भरपुर प्रमाणात असते. त्यामुळे सगळ्या साठी हेल्दी पाक कृती आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • पंजाबी
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1-1/2 कप उडद डाळ, चना डाळ, तुर डाळ, मसुर डाळ
  2. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  3. 1/4 कप बारीक चिरलेला हिरवा लसुण
  4. 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो
  5. 1 कप बारीक चिरलेला कांदा
  6. 1-2 चमचा लाल तिखट
  7. 1/2 चमचा हळद
  8. चवी पुरते मीठ
  9. 2 चमचा गरम मसाला
  10. 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. उडद डाळ, चना डाळ, तुर डाळ, मसुर डाळ एकत्र करून 1/2 तास भिजत ठेवावे.
  2. कुकर मध्ये भिजवून घेतलेले डाळी, थोडे मीठ आणि हळद घालून 2-3 शीट्या काढावीत.
  3. कढईत तेल तापवून त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या.
  4. त्यात बारीक चिरलेला हिरवा लसुण व टोमॅटो घालून एकत्र करावे.
  5. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे जिरे पावडर घालून एकत्र करून घ्यावे.
  6. त्यात शिजवून घेतलेल मिक्स डाळ घालावी व चांगले उकळून घ्या.
  7. गॅस बंद करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडे बटर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर