मुख्यपृष्ठ / पाककृती / कडधान्याचे चटपटीत पापड कोन

Photo of CHATPATE Cone by Aditi Bhave at BetterButter
731
2
0.0(0)
0

कडधान्याचे चटपटीत पापड कोन

Jan-22-2019
Aditi Bhave
480 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडधान्याचे चटपटीत पापड कोन कृती बद्दल

वेगवेगळी मोड आलेली कडधान्ये , व उडदाच्या डाळीचा पापड वापरून केलेले चटपटीत कोन जरा वेगळा प्रकार करून पाहिला . आणि इतका मस्त झाला की पटकन संपून गेला. असा नवीन पौष्टिक पदार्थ खाऊ म्हणून मुलांना दिला म्हणून मला पण छान वाटलं:relaxed:️

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मटकी - पाव वाटी
  2. मूग - पाव वाटी
  3. मसूर - पाव वाटी
  4. पुदीना - 1 मूठभर
  5. लिंबू - अर्धे
  6. मिरची - 2
  7. खजूर - 1 वाटी
  8. चिंच - पाव वाटी
  9. गूळ - पाव वाटी
  10. मीठ - चवीनुसार
  11. तिखट - गरजेनुसार
  12. चाट मसाला - 1 ते 2 चमचे
  13. शेव - पाव वाटी
  14. उडीद पापड - 4 ते 5

सूचना

  1. साहित्य
  2. मूग, मटकी , मसूर वेगवेगळे कोमट पाण्यात भिजवावे.
  3. 2 ते 3 तास भिजवून मग कापडात बांधून ठेवावे.
  4. 4 तासांनी मोड येतील .
  5. हिरव्या चटणी साठी- पुदिना , लिंबू , मिरची मीठ एकत्र घेऊन पाणी घालून मिक्सरमध्ये बसरीक करून घ्यावे.
  6. गोड चटणी साठी- बिया काढून खजूर घ्यावा .
  7. 1 तास कोमट पाण्यात भिजवून ठेवावा.
  8. चिंच भिजवून ठेवावी.
  9. चिंच , खजूर व गूळ एकत्र वाटून घ्यावे.
  10. आता मोड आलेली कडधान्ये थोडीशी वाफवून घ्यावी.
  11. मग यात तिखट, मीठ, जरासा चाट मसाला घालून मिक्स करावे.
  12. पापड अर्धे करून घ्यावे.
  13. तवा गरम करून त्यावर हे पापड शेकवून घ्यावे.
  14. पापड गरम असतानाच थोडा मऊ असतो.
  15. तेव्हाच त्याचा कोन बनवावा.
  16. आता या कोनात मोड आलेल्या कडधान्याचे मिश्रण घालावे.
  17. मग तिखट(हिरवी चटणी) चटणी घालावी
  18. गोड चटणी घालावी .
  19. चाट मसाला घालावा.
  20. वरून बारीक शेव घालावी.
  21. कडधान्ये घालून केलेले पापडाचे कोन तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर