Photo of Chavali Vade by Deepa Gad at BetterButter
1479
8
0.0(0)
0

चवळी वडे

Jan-23-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
360 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळी वडे कृती बद्दल

आज मी चवळीची उसळ करण्यासाठी चवळी भिजत घातली होती ती जरा जास्त झाली म्हणून थोडी बाजूला काढून ठेवली होती, मग डोक्यात विचारचक्र चालूं काय बरं करावे या चवळीचे... मग डाळ वडे आठवले त्यातूनच ही चवळी वडे रेसिपी तयार झाली, चव एवढी भन्नाट आलीय म्हणून सांगू... तुम्ही करूनच बघा म्हणजे कळेल. चला तर वळू या रेसिपीकडे....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप चवळी भिजवलेली
  2. १ कांदा चिरलेला
  3. २-३ हिरव्या मिरच्या चीरलेल्या
  4. आले १ च चिरलेले
  5. कढीपत्ता ७-८ पाने चिरलेली
  6. कोथिंबीर चिरलेली
  7. हळद १/२ च
  8. तिखट १ च
  9. जिरे १ च
  10. हिंग
  11. मीठ
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. ५-६ तास भिजवलेली चवळी मिक्सरमधून पाणी न टाकता पेस्ट करून घ्या
  2. बाकी सर्व साहित्य तयार ठेवा
  3. पेस्टमध्ये वरील सर्व साहित्य व कोथिंबीर घालून एकजीव करा
  4. हाताला पाणी लावून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन चपटे करा व तेलात तळा
  5. मंद गॅसवर खरपुस तळा आणि हिरवी चटणी व टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर