मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या हिरव्या चण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी.

Photo of Green Chickpeas Stuff Aamti. by Triveni Patil at BetterButter
7
4
0.0(0)
0

ओल्या हिरव्या चण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी.

Jan-24-2019
Triveni Patil
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या हिरव्या चण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी. कृती बद्दल

सध्याच्या थंडीच्या दिवसांत छान टपोरे ओले हरभरे येतात मी या हरभऱ्याचे दाणे भाजुन चाट मसाला, तिखट मीठ घालून मस्त पैकी चाट करते पण या वेळेस एक अफलातुन रेसिपी शेअर करत आहे, रेसिपी तशी थोडी किचकट आहे पण ओले हरभरे बाजारात आले आणी ही आमटी नाही खाल्ली तर नवलच पोळी भाता पेक्षा सुप सारखी प्यायला तर अफलातून लागते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • इतर
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • बॉइलिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. १. ३ वाट्या ओले हरभरे ( सोलाने ).
 2. २. २ मोठे कांदे बारीक चिरून.
 3. ३. १२-१५ लसूण पाकळ्या.
 4. ४.१ ते दीड इंच आलं (पेस्ट करा).
 5. ५. वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर.
 6. ६.२ टेबलस्पून डाळीचं पीठ (बेसन).
 7. ७.२ टीस्पून तिखट.
 8. ८. १. टिस्पुन हळद.
 9. ९. १. टिस्पुन गरम मसाला.
 10. १०. मीठ चवीनुसार.
 11. फोडणीसाठी –
 12. १.२ टेबलस्पून तेल.
 13. २.१. टि.स्पुन जिरंं मोहरी.
 14. ३. चिमुटभर हिंग.
 15. पारी साठी -
 16. १.१वाटी गव्हाचे पिठ.
 17. २. अर्धी वाटी तांदळाचे पिठ.
 18. ३. पाव वाटी बेसन पिठ.
 19. ४. चवी पुरते मीठ.
 20. ५. कणीक भिजायला पाणी.

सूचना

 1. १) पारी च्या साहित्यातील सर्व साहित्य एकत्र करून पोळ्यांना भिजवतो तशी पण अगदी घट्ट कणीक भिजवुन साईड ला ठेवा.
 2. २) हरभरे तव्यावर थोडे तेल टाकुन शँलो फ्राय भाजुन घ्या, थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्या.
 3. ३) आता एका कढईत तेल गरम करून नेहमीसारखी फोडणी करा. नंतर त्यात कांदा घाला आणि मधून मधून हलवत चांगला होऊ द्या.
 4. ४) कांदा शिजला की त्यात आलं-लसणाची पेस्ट घाला, परत चांगलं परता.
 5. ५) पेस्टचा कच्चा वास गेला आणि मिश्रण चांगलं परतलं गेलं की त्यात कोथिंबीर, हळद, तिखट, गरम मसाला मीठ आणि कोथिंबीर घाला. नीट मिसळून घ्या.
 6. ६) आता त्यात हरभऱ्याची भरड घाला, नीट हलवून झाकण ठेवून, मधेमधे हलवत ५ मिनिटं शिजू द्या. गरज वाटल्यास अर्धा कप पाणी घालून वाफ काढावी.
 7. ७) भरड शिजत आली की त्यात डाळीचं पीठ घाला. हलवून घ्या आणि झाकण ठेवून २-३ मिनिटं शिजू द्या, गॅस बंद करा.
 8. ८) हे सारण एका ताटात काढून थंड होऊ द्या. सारणातलं पाऊण वाटी सारण बाजूला ठेवून द्या, आपल्याला ते आमटीत वापरायचं आहे.
 9. ९) करंज्या करण्यासाठी अगदी लहानशा लिंबाएवढ्या कणकेची पारी लाटा. त्यात सारण भरा आणि करंजीसारखं दुमडून कडा अगदी घट्ट बंद करा.
 10. १०) पारी लाटताना थोडी जाडसरच लाटा. अशा सगळ्या करंज्या करून घ्या. बाजूला ठेवा.
 11. ११) आता एका मोठ्या पसरट कढईत किंवा पातेल्यात तेल घालून नेहमीसारखी फोडणी करा.
 12. १२) फोडणी झाली की त्यात वरिल सारणातील बाजुला काढुन ठेवलेले सारण घालुन छान परतुन घ्या, हवं असल्यास थोडंसं तिखट घाला आणि साधारणपणे दीड लिटर पाणी घाला. पाण्याला अगदी खळखळून उकळी येऊ द्या.
 13. १३) पाणी खळाखळा उकळायला लागलं की त्यात हलक्या हातानं करंज्या सोडा.
 14. १४ ) करंज्या सोडल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा. सतत हलवू नका. अगदी हलक्या हातानं, उलथन्यानं हलवा म्हणजे करंज्या मोडणार नाहीत. करंज्या अगदी २-३ मिनिटंच शिजवा.
 15. १५) हरभऱ्याची दाण्यांची तिखट करंज्यांची आमटी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर