मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळ पिझ्झा

Photo of Mugdal Pizza by Deepa Gad at BetterButter
309
3
0.0(0)
0

मुगडाळ पिझ्झा

Jan-24-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
210 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळ पिझ्झा कृती बद्दल

मुगडाळीची भजी, डोसे, वडे, भाजी करतात हे माहीत होतं पण मूगडाळीचा पिझ्झा आणि तोही चीझ शिवाय.... विश्वास नाही बसत ना..... मग बघाच ही रेसिपी करून

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 3/4 कप मुगडाळ
  2. आलं १ इंच
  3. हिरव्या मिरच्या ४-५
  4. कोथिंबीर २ च बारीक चिरलेली
  5. गरम मसाला १ च
  6. तिखट १ च
  7. आमचूर पावडर १ च
  8. धणेपूड १ च
  9. हळद १/२ च
  10. कांदा १ बारीक चिरलेला
  11. हिरवी सिमला मिरची १ बारीक चिरलेली
  12. टोमॅटो १ बारीक चिरलेला
  13. स्वीट कॉर्न २ च
  14. मीठ
  15. तेल
  16. खायचा सोडा १/२ च

सूचना

  1. मुगडाळ ३ तास पाण्यात भिजवून नंतर पाणी काढून मिक्सरमध्ये घ्या
  2. मिक्सरमध्ये वाटताना त्यात आलं व हिरवी मिरची २ टाकून वाटून पेस्ट करून घ्या ( पाणी घालू नका)
  3. सर्व भाज्या चिरून तयार ठेवा
  4. चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, स्वीट कॉर्न, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व एका बाउलमध्ये घ्या
  5. त्यात सर्व मसाले, मीठ टाका. आणि एकजीव करा.
  6. गॅसवर पॅन गरम करायला ठेवा
  7. मुगडाळीच्या पेस्टमध्ये वरील कांद्याचे मिश्रण अर्ध घाला. व खायचा सोडा घालून अलगद ढवळा.
  8. पॅनवर तेल ३-४ च घाला व मुगडाळीचे मिश्रण सर्व पसरा
  9. त्यावर राहिलेले अर्धे कांद्याचे मिश्रण पसरा. वरून तेल घाला
  10. झाकण ठेवून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर शिजवा चांगले खरपूस भाजले पाहिजे.
  11. सावकाश पलटी मारा
  12. परत झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवा
  13. परत पलटी मारा व २ मिनिटे शिजवा म्हणजे खालचा भाग क्रिस्पी होईल
  14. डिशमध्ये काढा
  15. पिझ्झा कटरने कापा.
  16. डिशमध्ये पीस एकावर एक ठेवून कांद्याची रिंगने सजवा. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर