मुख्यपृष्ठ / पाककृती / मयाळुची दाळ घालून भाजी

Photo of Malabar Spinach curry by Triptila KS at BetterButter
1408
1
0.0(0)
0

मयाळुची दाळ घालून भाजी

Jan-25-2019
Triptila KS
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मयाळुची दाळ घालून भाजी कृती बद्दल

माझ्या आईच्या घरी अंगणात लावली होती मयाळुची भाजी .मला लहानपणी खूप आवडायचि . आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे माझ्या आवडत्या भाजेची रेसिपी .या भाजेत वड्यांचा उपयोग केला जातो . 'वडियो' हे गोव्यात केले जाणारे कोहळ्याचे आणि उडीद दाळचे मसाले घालुन केले जाणारे सांडगे आहेत .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मायाळू ची भाजी एक जुडी
  2. तूर डाळ पाव वाटी
  3. ओला कोब्रा एक वाटी
  4. हळद १/४ छोटा चमचा
  5. गोडा मसाला १/२ छोटा चमचा
  6. चीनचं छोट्या सुपारी एवढा
  7. तेल १ मोठा चमचा
  8. मोरी १/२ छोटा चमचा
  9. हिंग छोटा तुकडा
  10. कोहळ्याचे सांडगे (वडियो) ६
  11. चवीपुरता गूळ
  12. चवीपुरता मीठ

सूचना

  1. तूरदाळ एक तास भिजत घाला
  2. प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घ्या
  3. भाजी बारीक चिरून वाफवून घ्या
  4. ओलं खोबरं ,हळद, लाल तिखट ,गोडा मसाला,चीनचं मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या
  5. भाजी डाळ आणि वाटलेलं मिश्रण घालून उकळी येऊ द्या
  6. एका कढईत तेल घालून कोहळ्याचे सांडगे तळून घ्या आणि भाजीत घाला
  7. वरून मोरी आणि हिंगाची फोडणी द्या
  8. चवीपुरता गूळ आणि मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर