नॅनो कचोरी | Nano kachori Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  25th Jan 2019  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Nano kachori by Sapna Asawa Kabra at BetterButter
नॅनो कचोरीby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

13

0

नॅनो कचोरी recipe

नॅनो कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nano kachori Recipe in Marathi )

 • मैदा 2 कप
 • तूप 1/4 कप
 • ओवा 1/2 टी स्पून
 • मीठ स्वादानुसार
 • भिजलेली मूग डाळ 1/2 कप
 • सारण साठि लागणारे साहित्य
 • बेसन 4 टेबल स्पून
 • लाल तिखट 1/2 टी स्पून
 • हळद 1/2 टी स्पून
 • धना पावडर 1 टेबल स्पून
 • गरम मसाला 1 टी स्पून
 • बडीशोप 1 टेबल स्पून
 • साबूत धना 1 टेबल स्पून
 • आमचूर पावडर 1 टेबल स्पून
 • पिठी साखर 1 1/2 टी स्पून
 • कसुरी मेथी 1/2 टी स्पून
 • तेल
 • हिंग चिमटी भर
 • मीठ स्वादानुसार

नॅनो कचोरी | How to make Nano kachori Recipe in Marathi

 1. प्रथम एका भांड्यात मैदा, तूप, ओवा, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठ मळून घ्यावे व सेट होण्यासाठी बाजूला ठेवावा
 2. आता भिजवलेले मूग डाळ मिक्सर मधून बारीक करून घ्यावी
 3. एका कढईत तेल गरम करून त्यात बडीशोप व साबूत धना भाजुन घ्या
 4. आता त्यात बेसन पीठ घालून चांगले परतून घ्यावे
 5. आता वाटलेले मूग डाळ घालून चांगले परतून घ्यावे
 6. आता त्यात लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, हिंग व स्वादानुसार मीठ घालून चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे
 7. आता त्यात कसुरी मेथी, पिठी साखर व आमचूर पावडर घालून चांगले मिक्स करावे व सारण गार करायला ठेवावे
 8. एकी कडे तेल गरम करायला ठेवा
 9. तयार मैद्याच्या पिठाचे लहान लहान गोळे करून घ्यावे
 10. गार झालेल्या सारणाचे पण लहान लहान गोळे करून घ्यावे
 11. आता मैदाचा गोळा हातावर घेऊन थोडा दाबून त्यात सारणाचा गोळा ठेवून चारी बाजूंनी फोल्ड करावी
 12. अशा प्रकारे बाकी सर्व कचोरी तयार करून घ्यावे
 13. तयार कचोरी तेलात तळून सरविंग डिश मध्ये काढून घ्यावी

Reviews for Nano kachori Recipe in Marathi (0)