Photo of SPROUTS SURPRISE by Aditi Bhave at BetterButter
497
8
0.0(2)
0

SPROUTS SURPRISE

Jan-25-2019
Aditi Bhave
120 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मोडआलेले मूग -अर्धी वाटी
  2. मोड आलेले मसूर - अर्धी वाटी
  3. मोड आलेली मटकी- अर्धी वाटी
  4. मैदा - दिड वाटी
  5. रवा - पाव वाटी
  6. दही - 1 चमचा
  7. ओवा - 1 चमचा
  8. गरम मसाला - 1 चमचा
  9. चाट मसाला - अर्धा चमचा
  10. मीठ - चवी नुसार
  11. तेल - तळण्यासाठी
  12. तूप - 1 चमचा

सूचना

  1. साहित्य
  2. सगळी कडधान्ये वाफवून घ्यावी.
  3. मैदा, रवा एकत्र करावा. त्यात ओवा , दही , मीठ घालावे.
  4. तुप व 1 चमचा तेल गरम करून या मिश्रणात घालावे.
  5. आता हे पीठ पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावे. 2 तास ठेवून द्यावे.
  6. एका कढईत तेल गरम करून त्यात वाफवलेली कडधान्ये , गरम मसाला, चाट मसाला, मीठ घालून परतावे , पाणी राहू नये
  7. आता मैद्याचे गोळे करून लाटावेत
  8. त्याचा सुरीने चौकोनी आकार करावा.
  9. आता यात एका बाजूला कडधान्याचे मिश्रण घालावे.
  10. दुसऱ्या भागात सुरीने उभे काप द्यावेत.
  11. आता याची वळकटी करावी
  12. अशी होते
  13. मग दोन्ही बाजू एकत्र जोडाव्यात आणि गोल करावा.
  14. तेल गरम करावे व त्यात हे मंद गॅसवर तळून घ्यावेत.
  15. कडधान्याचे सरप्राईज तयार.
  16. केचप बरोबर गरम गरम खावे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vaishali Dongare
Mar-20-2019
Vaishali Dongare   Mar-20-2019

Very nice

samina shaikh
Jan-25-2019
samina shaikh   Jan-25-2019

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर