मुख्यपृष्ठ / पाककृती / मुग उसळ हेल्दी कुलचा

Photo of Green Sprouts Healthy Kulcha. by Triveni Patil at BetterButter
626
5
0.0(0)
0

मुग उसळ हेल्दी कुलचा

Jan-25-2019
Triveni Patil
90 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग उसळ हेल्दी कुलचा कृती बद्दल

अर्मुतसारी कुलचा बनवतांना सुचलेली एक भन्नाट कल्पना व लगेच आमलांत आणली रिझल्ट नक्कीच छान मिळाला, नवऱ्याला व मुलीला दोघांना खुप आवडला स्प्राऊटस् स्टफ कुलचा. मिसळ बरोबर पाव किंवा ब्रेड ऐवजी खायला उत्तम पर्याय.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • पंजाबी
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. १. २ कप मैदा.
  2. २.१ टिस्पुन बेकिंग पावडर.
  3. ४.अर्धा टे.स्पुन बारिक साखर.
  4. ५.१/४ कप दही (महत्त्वाची टीप १).
  5. ६.१/४ कप कोमट पाणी.
  6. ७.चवीपुरते मिठ (साधारण १/२ ते १ टिस्पून).
  7. ८.२ ते ३ टेस्पून तेल.
  8. ९.२. टे. स्पुन कलोंजी किंवा काळे तीळ.
  9. १०. अर्धी वाटी किसलेले चिझ.
  10. ११. बारिक चिरलेली कोथिंबीर.
  11. स्टफिंग साठी -
  12. मोड आलेल्या मुगाची उसळ.

सूचना

  1. १) मैदा एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन त्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, बारिक साखर व मिठ, व २ टे. स्पुन तेल घालावे. १/४ कप दही घालून मळावे. पिठ मळायला अजून कोमट पाणी वापरावे. पिठ एकदम सैल मळून घ्यावे. हाताला तेल लावून निट मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचा व्यवस्थित गोळा करावा आणि वरून थोडा तेलाचा मुलामा हात लावुन. वरती झाकण ठेवून उबदार ठिकाणी साधारण १ तासभर ठेवावे म्हणजे पिठ चांगले फुलून येईल.
  2. २) तासाभरानंतर फुललेले पिठ परत एकदा मळून घ्यावे. हाताला थोडे तेल लावून पिठाचे ४ ते ५ समान गोळे करावेआता गोळा घेवून त्याची हातावरच एक खोलगट पारी करावी व त्यात मुगाच्या उसळचे स्टफिंग भरावे त्यावर किसलेले चिझ टाकुन, पारी निट बंद करून गोळा करावा.
  3. उसळचे स्टफिंग भरुन
  4. ३) आता कोरड्या पिठात बुडवून घेऊन त्यावर समोरील बाजूस कलोंजी किंवा काळे तीळ टाकुन हलक्या हाताने प्रेस करुन चिपकवावे.स्टफिंग करून बंद केलेली बाजु खालच्या बाजूस असावी, अंडाकृती कुलचा लाटावे.
  5. ४) कुलचा ची मागील बाजु म्हणजे पोळपाटा कडील साईड उलट करुन त्याला पाण्याचा हात लावावा, व तव्यावर पाणी लावलेल्या साईड ने नान टाकुन हलक्या हाताने प्रेस करावा म्हणजे नान तव्याला व्यवस्थीत चिपकेल.
  6. ५) गँस स्लिम फ्लेमवरच असावा आता नान खालच्या बाजूने फुलायला लागेल तसा तवा हातात घेवुन गँस ची फ्लेम मिडियम करुन तवा उलट करुन कुलचा ची वरिल बाजु ब्राऊन रंगावर भाजुन घ्यावी अशा प्रकारे कुलचा दोघं बाजुंनी व्यवस्थीत भाजला गेला पाहिजे. ब्राऊन स्पॉट्स आल्यावर काढावा.
  7. ६) गरमागरम कुलचावर बटर लावून त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आणि लगेच सर्व्ह करावे. त्याच प्रकारे सर्व मुग स्टफ कुलचा करुन घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर