मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स कडधान्याचे सेन्डविच ढोकळे

Photo of Mix sprouts sendwich dhokla by seema Nadkarni at BetterButter
24
4
0.0(0)
0

मिक्स कडधान्याचे सेन्डविच ढोकळे

Jan-27-2019
seema Nadkarni
1470 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स कडधान्याचे सेन्डविच ढोकळे कृती बद्दल

डाळ तांदूळ चे ढोकळे नेहमी च बनतात. पण हि पाक कृती मध्ये मी सगळे कडधान्य वापरून त्यांचा हेल्दी ढोकळा केला आहे...

रेसपी टैग

 • एग फ्री
 • मध्यम
 • गुजरात
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्टीमिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 3 कप तांदूळ
 2. 1 कप उडीद डाळ
 3. 1/4 कप चना डाळ
 4. 1 कप मिक्स कडधान्य (मुग, मटकी, काळे चणे, काबुली चणे, हिरवे पांढरे वाटाणे,चौळी)
 5. चवी पुरते मीठ
 6. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
 7. 1/2 चमचा हळद
 8. 1/4 टि स्पून बेकिंग सोडा
 9. 1/2 कप तेल फोडणी साठी
 10. 1/2 चमचा राई
 11. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

 1. उडदाची डाळ, चण्याची डाळ व तांदूळ एकत्र करून 7-8 तास भिजवून घ्यावे.
 2. सगळे कडधान्य एकत्र करून धुवून 7-8 तास भिजवून घ्यावे.
 3. तांदूळ व उडदाच्या डाळीचे मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. परत 7-8 तास झाकून ठेवावे.
 4. 7-8 तासाने कडधान्य चे मिश्रणा चे पाणी काढून रुमालात बांधून मोड आणायला ठेवावे.
 5. मोड आलेले कडधान्य व सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
 6. मोड आलेले कडधान्य, हळद, मीठ, आले लसुण पेस्ट, धणे जिरे पावडर घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे
 7. आता कढईत थोडे पाणी घालून त्यात रींग ठेवावे व ताट ठेवून गरम करायला ठेवावे.
 8. तांदूळ, डाळी चे ढोकळ्या चे मिश्रणात मीठ घालून एकत्र करावे. ताटाला तेल लावून त्यावर ढोकळ्या चे मिश्रण एक चमचा भर घेऊन पसरवून घ्यावे.
 9. ताटाला गरम झालेल्या कढईत ठेवून 1 सेकंद ठेवून वाफ काढावी.
 10. कडधान्याचे वाटलेल मिश्रणात थोडा सोडा एक चमचा तेल व पाणी एकत्र करून घ्यावे.
 11. कडधान्य चे वाटलेल मिश्रणाला हलवत ढोकळ्या च्या पांढर्‍या लेयर वर पसरवून घ्यावे. व 1 सेकंद साठी वाफ काढावी.
 12. आता परत पांढर्‍या ढोकळ्या चे मिश्रण ला कढधांन्या चे मिश्रणा वर तिसरा लेयर घालून पसरवून घ्यावे. व 10-15 मिनिटे झाकून वाफ आणावी.
 13. तयार झालेल्या ढोकळ्या चे ताट थंड करून घ्यावे. सुरीने चौरस आकार कापून घ्या.
 14. ढोकळे थंड करून घ्यावे.
 15. कढईत तेल तापवून त्यात राई व हिंग ची फोडणी करून त्यात हे ढोकळे फोडणी करून घ्या. त्यात लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे.
 16. फोडणी करून गरम गरम सवँ करावे.
 17. हिरवी चटणी, सोस सोबत हे एकदम हेल्दी ढोकळे सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर