मुख्यपृष्ठ / पाककृती / उडीद डाळीची इमृती

Photo of Urad dal Imruti by archana chaudhari at BetterButter
1020
4
0.0(0)
0

उडीद डाळीची इमृती

Jan-27-2019
archana chaudhari
720 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीद डाळीची इमृती कृती बद्दल

उडीद डाळ वापरून केलेली ही मनमोहक इमृती चवीला देखील अप्रतिम लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. साले काढलेली उडीदाची डाळ १ कप
  2. तांदळाचे पीठ १ १/२(दीड) टेबलस्पून
  3. खाण्याचा नारिंगी रंग १/२ टीस्पून
  4. पाकासाठी
  5. साखर १ १/२ (दीड ) कप
  6. पाणी १ १/४ कप
  7. तळण्यासाठी तूप किंवा तेल

सूचना

  1. उडीदाची डाळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
  2. सकाळी पाणी निथळून दोन..तीन वेळेस पुन्हा धुवून थोडेसे पाणी टाकून मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घ्या.
  3. एका भांड्यात पाणी आणि साखर एकत्र करून पाक बनविण्यासाठी गॅस वर ठेवा.
  4. एकतारी पाक बनवून घ्या.
  5. आता उडीद डाळीच्या पेस्ट मध्ये तांदळाचे पीठ, नारंगी रंग घालून छान फेटून घ्या.
  6. पायपिंग बॅग मध्ये वरील मिश्रण भरा.
  7. पसरट पॅन मध्ये तेल तापायला ठेवा.
  8. आता त्यात इमृती बनवा.
  9. याप्रमाणे
  10. मध्यम आचेवर तळून घ्या.
  11. आता तयार पाकमध्ये बुडवून ठेवा आणि काढून घ्या.
  12. याप्रमाणे सगळ्या इमृत्या बनवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर