Photo of Panipuri by Deepa Gad at BetterButter
1079
3
0.0(0)
0

पाणी पुरी

Jan-27-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाणी पुरी कृती बद्दल

आज मी घरीच पाणीपुरीचा बेत केलाय. या खायला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 8

  1. चिंचेची चटणी बनविण्यासाठी :
  2. १/२ कप खजूर
  3. ३/४ कप चिंच
  4. १/२ कप गुळ
  5. 2 कप पाणी
  6. ३-४ लाल मिरच्या
  7. १/२ च जिरेपूड
  8. १/२ च धणेपूड
  9. १/४ च सैंधव मीठ
  10. साधं मीठ
  11. हिरवी चटणीसाठी :
  12. १/२ कप पुदिना
  13. १/२ कप कोथिंबीर
  14. २ हिरव्या मिरच्या
  15. आलं १/२ च
  16. लिंबूरस १ च
  17. १/४ च सैंधव मीठ
  18. १/४ च साधं मीठ
  19. पाणीपुरीसाठी :
  20. १/२ कप पुदिना
  21. १/२ कप कोथिंबीर
  22. २ हिरव्या मिरच्या
  23. १/४ कप चिंचेचा कोळ
  24. १ च चाट मसाला
  25. १/४ च सैंधव मीठ
  26. ३/४ च जिरेपूड
  27. सुंठपूड १/४ च
  28. मिरपूड १/४ च
  29. ४-५ कप पाणी
  30. सारण :
  31. सफेद वाटाणे १/२ किलो भिजवलेले
  32. हळद १/२ च
  33. जिरेपूड १/४ च
  34. धणेपूड १ च
  35. मीठ

सूचना

  1. खजूर चटणीसाठी : खजूर, चिंच, गुळ, लाल मिरची १ तास थोड्या पाण्यात भिजत ठेवा.
  2. मिक्सरमध्ये वाटून गाळुन घ्या
  3. गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात बाकी जे मसाले आहेत ते टाका. थंड करा. ही झाली चिंचेची चटणी तयार
  4. हिरव्या चटणीसाठी : सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घ्या, ही हिरवी चटणी तयार.
  5. भिजवलेले सफेद वाटाणे कुकरमध्ये लावताना त्यात हळद, जिरेपूड, धणेपूड, मीठ घालून मऊ शिजवून घ्या.
  6. पाणीपुरीच्या पाणीसाठी सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या पाणी घालून पातळ करा
  7. पुऱ्या फोडून त्यात वाटण्याचे सारण भरा, हिरवी चटणी, खजूर चटणी घाला वरून पाणीपुरीच्या पाण्यात खारी बुंदी घालून घाला.
  8. सर्व करा मस्त होम मेड पाणी पुरी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर