मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट पडवळ भाजी

Photo of Snake Gourd Veggie by Shraddha Juwatkar at BetterButter
1023
2
0.0(0)
0

झटपट पडवळ भाजी

Jan-29-2019
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट पडवळ भाजी कृती बद्दल

पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे त्वचाविकारांवर पडवळ परिणामकारक आहे. थंडीच्या दिवसात अनेक त्वचारोग बळावतात अशावेळी आहारात पडवळाचा आर्वजून सहभाग करावा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो पडवळ
  2. 1 वाटी चणाडाळ
  3. 1 मध्यम कांदा बारीक चिरलेला
  4. 4/5 हिरव्या मिरच्या व 2 पाकळ्या लसूण बारीक चिरून
  5. 1 वाटी किसलेले ओले खोबरे व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. फोडणी साठी तेल, मोहरी व जिरे
  7. 1 टीस्पून हळद
  8. चवीनुसार मीठ व 2 चमचे पाणी

सूचना

  1. डाळ तासभर तरी कोमट पाण्यात भिजत घालावी
  2. पडवळ मधोमध उभे चिरावे बिया जुन असतील तर काढुन टाकाव्यात आणि चकत्या कराव्यात. अर्धचंद्राकृती चकत्या होतील व थोडे मीठ लावून पाच मिनिटे झाकून ठेवावे.
  3. कुकर मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे व लसूण घालून फोडणी करावी. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लालसर रंगावर परतून घ्यावा हळद घालून चांगले परतून घ्यावे.
  4. चण्याची डाळ घालून व्यवस्थित परतून घ्यावे व पडवळातले पाणी हाताने दाबून काढून पडवळ घालावे.
  5. चवीनुसार मीठ व ओले खोबरे कोथिंबीर घालून ढवळून थोडे पाणी घालून गॅस बंद करावा व दोन शिट्ट्या करून घेणे.
  6. झटपट भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर