मुख्यपृष्ठ / पाककृती / नवलकोलचा पळवा

Photo of NAVALKOLVHA palava by minal sardeshpande at BetterButter
22
4
0.0(0)
0

नवलकोलचा पळवा

Jan-29-2019
minal sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
65 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नवलकोलचा पळवा कृती बद्दल

सिझनल भाज्या आणि मिश्र कडधान्य भाजणी वापरून केलेलं पौष्टिक तोंडीलावणं

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. 12/ 15 नवलकोल ची पाने
 2. भाजणी पीठ दोन वाट्या
 3. तिखट दीड चमचा
 4. मीठ
 5. चिंच कोळ दोन चमचे
 6. गूळ दोन चमचे
 7. हळद पाव चमचा
 8. दोन टीस्पून तेल
 9. खोबरं
 10. कोथिंबीर
 11. फोडणीचे साहित्य
 12. पाणी

सूचना

 1. नवलकोल ची मोठी पाने धुवून पुसून घ्या.
 2. भाजणीत चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, तिखट, हळद आणि पाणी घालून भिजवावे. हाताने पसरता आले पाहिजे.
 3. असे
 4. पान उलट करून पीठ लावून घ्या.
 5. अशी चार पाच पाने उलट सुलट ठेवून पीठ लावा.
 6. कडा दुमडून गुंडाळी करा.
 7. तयार गुंडाळी
 8. तयार गुंडाळ्या मोदकाप्रमाणे 20 मिनिटं वाफवून घ्या.
 9. गार झाल्यावर चिरून घ्या.
 10. चिरलेली
 11. तेलाची हिंग, मोहोरी, हळद घालून फोडणी करून त्यात परता.
 12. खोबरं, कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर