मुख्यपृष्ठ / पाककृती / मक्याची आंबिल

Photo of Makyachi Aambil by Vaishali Joshi at BetterButter
619
4
0.0(0)
0

मक्याची आंबिल

Jan-30-2019
Vaishali Joshi
480 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मक्याची आंबिल कृती बद्दल

मक्याची भरड गिरणीतून दळुन आणून त्याला चाळून घेऊन त्यातील पिठ आणि भरड वेगळे केले व आंबील बनविण्यासाठी फक्त भरड किंवा सोजी चा वापर केला आहे . हि आंबिलपौष्टिक आणि चविष्ट लागते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. वाळलेल्या मक्याची भरड / सोजी २ कप
  2. आंबट ताक २-३ कप
  3. पाणी
  4. तेल २ टिस्पून
  5. राई
  6. हिंग
  7. हळद १/२ चमचा
  8. मिठ चवीनुसार
  9. भिजवून ठेवलेले शेंगदाणे १/४ कप
  10. ओल्या नारळाचे काप १/४ कप
  11. हिरवी मिरची १
  12. आल्याचा तुकडा १ इंच
  13. करीपत्ता ८-९ पाने
  14. कोथिंबीर सजावटीसाठी
  15. खवलेला नारळ सजावटीसाठी

सूचना

  1. मका दळुन आणल्यावर चाळुन भरड वेगळी करून घ्या .
  2. मक्याची भरड / सोजी आंबट ताका मध्ये ७-८ तास भिजवून ठेवा
  3. शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवा
  4. गॅस वर कढई तापत ठेवा आणि २ टिस्पून तेल घालून ते तापल्यावर त्यात राई आणि हिंग घालून घ्या
  5. हिरवी मिरची चिरून ,करीपत्ता घाला आणि हळद घालून त्यात भिजवून ठेवलेली मक्याची भरड / सोजी घालून मिक्स करा , सोबत त्यात भिजवून ठेवलेले शेंगदाणे पाणयासहित आणि ओल्या नारळाचे काप घालून परतावे
  6. आल्याचे उभे काप व थोडं पाणी घालून ढवळावे व झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी आणि शिजवून घ्यावे
  7. मधुन मधुन परतून घ्या आणि चविनुसार मिठ घालून मिक्स करा
  8. व्यवस्थीत शिजवून घ्या आणि गरमागरम किंवा थंड झाल्यावर त्यावर कोथिंबीर , आल्याचे उभे काप आणि खवलेला नारळ घालून सजवावे आणि सर्व्ह करावी मक्याची आंबिल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर