मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या पालेभाज्या व गाजर टोमॅटो सूप

Photo of Hirvya Palebhajya Gajar Tomato Soup by Vaishali Joshi at BetterButter
1665
1
0.0(0)
0

हिरव्या पालेभाज्या व गाजर टोमॅटो सूप

Jan-30-2019
Vaishali Joshi
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या पालेभाज्या व गाजर टोमॅटो सूप कृती बद्दल

घरात ज्या पालेभाज्या उपलब्ध होत्या त्या सर्व आणि गाजराचे तुकडे व टोमॅटो घेऊन छान असे एक हेल्दी सूप बनविले आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सूप
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 5

  1. पालक ५० ग्राम
  2. चाकवत ५० ग्राम
  3. सरसो ची भाजी ५० ग्राम
  4. गाजर १/२
  5. टोमॅटो १ मोठ
  6. मीठ चवीनुसार
  7. जिरे मीरे पावडर १ चमचा
  8. दालचिनी पावडर १/४ टीस्पून
  9. १ लिंबाचा रस
  10. बटर १ टिस्पून
  11. कणीक किंवा ज्वारीचे पीठ

सूचना

  1. सर्व पालेभाज्या धुवून घ्या आणि ब्लांच करून घ्या
  2. टोमॅटो उकळत्या पाण्यात घालून थोडा वेळ ठेवा व थंड झाल्यावर त्याचे साल काढून घ्या
  3. गाजर धुवून तुकडे करून वाफवून घ्या
  4. आता ब्लांच केलेल्या पालेभाज्या , टोमॅटो आणि गाजर एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घेवून बारीक पेस्ट करून ठेवा
  5. गॅस वर एक भांड्यात थोड बटर घालून कणीक किंवा ज्वारीचे पीठ घालून ते लालसर झाल्यावर त्यात बारीक करून ठेवलेली पेस्ट घालून लागेल तेवढे पाणी घाला .
  6. जिरे , मिरे ,दालचिनी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून १० मिनिटे उकळू द्या
  7. गॅस बंद करा आणि लिंबाचा रस घालून ढवळुन घ्या आणि वाफाळलेले सुप आवडत असल्यास सुपस्टिक घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर