मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळ पापड़ी

Photo of Gul papdi by supriya padave (krupa rane) at BetterButter
78
4
0.0(0)
0

गुळ पापड़ी

Jan-30-2019
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळ पापड़ी कृती बद्दल

पौष्टिक व पटकन होणारी तसेच घरात असलेल्या साहित्या मधे होणारी चविष्ट अशी गुळ पापड़ी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • गुजरात
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. एक वाटी गहु पीठ
 2. एक वाटी गुळ
 3. पाउण वाटी तूप
 4. दोन चमचे किसलेले सुक खोबरे
 5. दोन चमचे सफेद तीळ
 6. वेलचि जायफल पूड

सूचना

 1. किसलेले सुक खोबरे व् तीळ थोडेसे कोरडेच कढ़ईत परतुन घ्या त्यामुळे खाताना crunchy लागेल
 2. गुळ बारीक़ चिरून घ्या
 3. सर्व साहित्य जमा करा
 4. आता कढ़ईत तूप तापत ठेवा तूप चांगले गरम झाले की त्यात गहु पीठ टाका व् मंद आचेवर परतत रहा
 5. 7 ते 8 मिनिटांत पीठ गुलाबी रंगावर भाजुन होईल
 6. आता गैस बंद करा व् मिश्नण थोड़े ठण्ड होवू द्या तोपर्यत एका प्लेट ला तूप लावून घ्या
 7. आता मिश्रणात गुळ सुक खोबरे तीळ व् वेलचि पूड टाका व् सर्व नीट एकजीव करुन घ्या ,मिश्रण व् कढई गरम असल्यामुळे गुळ यात नीट वितळतो
 8. थोडेसे सुक खोबरे व् तीळ वरून लावण्या साठी ठेवा
 9. आता तूप लावल्या प्लेट मधे हे मिश्नण थापा व् वरून सुके खोबरे व् तीळ लावून सजवा
 10. थोड़े ठण्ड झाल्यावर सुरिने marking करा त्यामुळे वड्या नीट सुटतील
 11. आपली healthy गुळ पापडी तैयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर