मुख्यपृष्ठ / पाककृती / अळीव + गाजराचे लाडू

Photo of Halim + Carrot Ladoos by Shraddha Juwatkar at BetterButter
709
3
0.0(0)
0

अळीव + गाजराचे लाडू

Jan-30-2019
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळीव + गाजराचे लाडू कृती बद्दल

हळिवात प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, ‘क’ व ‘ई’ जीवनसत्त्वही आहे तसेच हिवाळ्यात आढळणारे लाल गाजर हे जीवनसत्वे आणि पोषण समृद्ध मानले जाते.  थंडीत हे पौष्टिक लाडू नक्की करून बघा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. पाव वाटी अळीव
  2. 2 वाटी गाजराचा किस
  3. 2 वाटी गुळ
  4. 1 नारळ
  5. आवडीनुसार वेलची व जायफळ पूड
  6. काजू बदामाचे काप
  7. लाडू वळण्यासाठी तूप

सूचना

  1. अळीव स्वच्छ निवडून घ्या. नारळ फोडून त्यातील पाणी अळीव मध्ये घाला.एका जाड बुडाच्या पातेल्यात ३-४ तास झाकून ठेवा
  2. गाजर किसणीवर बारीक किसून घ्यावे
  3. नारळातील खोबरे (पाणी न वापरता ) बारीक वाटून घ्या आणि तेही अळीवात मिसळून घ्या.
  4. नंतर अळिव, खोबरे आणि गाजराचा किस एकत्र मंद आंचेवर शिजत ठेवावा.
  5. अर्धे शिजत आले की त्यात गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे.अधून मधून ढवळत राहावे.
  6. लाडू होत आले की कडेने मिश्रण सुटू लागेल.उतरताना त्यात काजू बदामाचे काप व जायफळ, वेलची पूड घालून नीट मिक्स करून खाली काढा मिश्रण कोमट असतानाच तुपाचा हात लावून लाडू वळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर